कृषी सल्ला :- कापूस खतमात्रता शिफारस तसेच भात पीक नियोजन

कापूस :-
बी.टी. संकरित वाणाकरिता (जिरायती) पेरणीनंतर ३० दिवसांनी १६ किलो नत्र याप्रमाणे ३५ किलो निमकोटेड युरिया, पेरणीनंतर ६० दिवसांनी १६ किलो नत्र याप्रमाणे ३५ किलो निमकोटेड युरिया प्रति एकरी द्यावा. एकूण शिफारशीत खतमात्रा ४०:२०:२० किलो नत्र, स्फुरद, पालाश अशी असून, पेरणीच्या वेळी ८:२०:२० किलो नत्र, स्फुरद, पालाश याप्रमाणे १७ किलो युरिया, १२५ किलो एसएसपी, ३३ किलो एमओपी देण्याची शिफारस आहे. बी.टी. संकरित वाणाकरिता (बागायती) पेरणीनंतर ३० दिवसांनी २० किलो नत्र याप्रमाणे ४४ किलो निमकोटेड युरिया, पेरणीनंतर ६० दिवसांनी २० किलो नत्र याप्रमाणे ४४ किलो निमकोटेड युरिया प्रति एकरी द्यावा. एकूण शिफारशीत खतमात्रा ५०:२६:२६ किलो नत्र, स्फुरद, पालाश अशी असून, पेरणीच्या वेळी १०:२६:२६ किलो नत्र, स्फुरद, पालाश याप्रमाणे २२ किलो युरिया, १६२ किलो एसएसपी, ४३ किलो एमओपी देण्याची शिफारस आहे.


भात :-
भात खाचरातील पाणी पातळी रोप लागणीपासून रोपे स्थिर होईपर्यंत १ ते २ सें.मी. रोपांच्या वाढीच्या प्राथमिक अवस्थेत २ ते ३ सें.मी. अधिक फुटवे येण्याच्या अवस्थेत ३ ते ५ सें.मी. भात पोटरीच्या अवस्थेत ५ ते १० सें.मी. फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत १० सें.मी. कापणीपूर्वी १० दिवस अगोदर पाण्याचा निचरा करावा.

 



कृषिक अँप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लीक करा .

Post a Comment (0)
Previous Post Next Post