आडसाली ऊस
आडसाली ऊस पीक साधारणत: १५ ते १७ महिने शेतात उभे असते. त्यामुळे लागवडीसाठी मध्यम पक्व होणाऱ्या को ८६०३२ (नीरा), को एम ०२६५ (फुले २६५), को व्हीएसआय ९८०५ या जातींची निवड करावी. रोगग्रस्त, किडग्रस्त शेतातील व खोडव्याचे बेणे लागवडीस वापरू नये. ऊस बेणे मळ्यातीलच बेणे वापरावे. दर तीन ते चार वर्षांनी ऊस बेणे बदलावे. लागणीसाठी बेणेमळ्यात वाढविलेले ९ ते ११ महिने वयाचे निरोगी, रसरशीत आणि आनुवंशिकदृष्ट्या शुध्द बेणे वापरल्यास ऊस उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते. ऊस बेणे प्रक्रिया - काणी रोग आणि कांडीवरील खवले कीड, पिठया ढेकूण या किडींच्या नियंत्रणासाठी १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम आणि मॅलॅथिऑन किंवा डायमिथोएट ३०० मि.लि. प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून बेणे १० मिनिटे बुडवावे. या प्रक्रियेनंतर ॲसेटोबॅक्टर डायऍझोट्रॉपिकस १० किलो व स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक १.२५ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात टिपरी ३० मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी. जीवाणू संवर्धकाच्या प्रक्रियेमुळे ५० टक्के नत्र व २५ टक्के स्फुरद खतांची बचत आणि उत्पादनात वाढ होते.
ऊस लागवड सल्ला| आडसाली ऊस,सुरु ऊस |- krushikapp
खोडवा ऊस :-
ठिबक सिंचनाची सोय असल्यास ठिबक सिंचन संचातून ऊसासाठी पाण्याबरोबर शिफारशीत खत मात्रेच्या ८० टक्के विद्राव्य खते (८०:४०:४० नत्र, स्फुरद, पालाश किलो/ एकर) खोडवा ठेवल्यापासून प्रत्येक आठवड्यातून एकदा याप्रमाणे २६ हप्त्यांत दिल्याने ऊस उत्पादनात २८ टक्क्यांनी वाढ होऊन २० टक्के खतांच्या मात्रेत बचत होते. खोडवा पिकासाठी ठिबक सिंचनातून देण्यासाठी विद्राव्य खतांचे वेळापत्रक (किलो/ एकर/ हप्ता) आठवडे - युरिया - १२:६१:०० - एम.ओ.पी. १ ते ४ आठवडे - ०६ - ०२ - १.५ ५ ते ९ आठवडे - १० - ०६ - ०२ १० ते २० आठवडे - ६.५ - ४.५ - ०२ २१ ते २६ आठवडे - ०० - ०० - ०४
सुरु ऊस:-
उसाचे अधिक उत्पादन, पाण्याचा व खतांचा कार्यक्षम वापर आणि अधिक आर्थिक फायद्यासाठी शिफारशीत खतमात्रेच्या ८० टक्के विद्राव्य खते दर आठवड्यातून एकदा या प्रमाणे २६ हप्त्यांमध्ये ठिबक सिंचनातून द्यावीत.
सुरु ऊस पिकास ठिबक सिंचनातून विद्राव्य खते देण्याचे वेळापत्रक (प्रति आठवडा प्रति एकर) १ ते ४ आठवडे - युरिया ६.५ किलो, १२:६१:०० १.५ किलो, एम.ओ.पी. १.५ किलो ५ ते ९ आठवडे - युरिया १२ किलो, १२:६१:०० ४.२५ किलो, एम.ओ.पी. २ किलो १० ते २० आठवडे - युरिया ८ किलो, १२:६१:०० ३ किलो, एम.ओ.पी. २ किलो २१ ते २६ आठवडे – एम.ओ.पी. ४ किलो.
कृषिक अँप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लीक करा.