![]() |
लागवडीसाठी एक डोळा किंवा दोन डोळे टिपरी पद्धतीचा अवलंब करावा. जास्तीत जास्त उत्पादनासाठी १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत लागवड करावी. टिपरे तयार करताना डोळ्याच्या वरील १/३ भाग ठेवून धारदार कोयत्याने बेणे छाटावे. मध्यम काळ्या जमिनीसाठी (१ मीटर सरी अंतर) एकरी १२,००० टिपरी व भारी जमिनीसाठी (१.२ मीटर सरी अंतर) एकरी १०,००० टिपरी बेणे लागते. एक डोळा पद्धतीने लागवड करताना दोन डोळ्यातील अंतर ३० सें.मी. व दोन डोळ्यांच्या टिपऱ्यांची लागवड करताना दोन टिपऱ्यामध्ये १५ सें.मी. अंतर ठेवून डोळे बाजूस येतील अशा पद्धतीने लागवड करावी. आडसाली हंगामात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने लागवड सरीच्या बगलेत करावी. हलक्या मध्यम जमिनीत ओेली लागवड करावी, तर भारी चोपण / खारवट जमिनीत कोरड्या पद्धतीने ऊस लागवड करावी. पट्टा पद्धतीने लागवड करताना मध्यम जमिनीत ७५ सें.मी. वर दोन ओळी लावून १५० सें.मी. रुंदीचा पट्टा ठेवावा, तर भारी जमिनीत ९० सें.मी. वर दोन ओळी लावून १८० सें.मी. रुंदीचा पट्टा ठेवावा.
कृषी सल्ला | आडसाली ऊस,खोडवा ऊस,सुरु ऊस| - krushikapp
खोडवा ऊस
हुमणीच्या जैविक नियंत्रणासाठी बिव्हेरीया बॅसियाना, मेटाराझिम अॅनीसोप्ली, व्हर्टिसिलीयम लेकॅनी उपयुक्त ठरतात. हे जैविक नियंत्रक एकरी २ लिटर/किलो या प्रमाणात शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून, ड्रिपद्वारे किंवा ड्रेंचिंगद्वारे पिकाच्या मुळापाशी द्यावे. जीवाणू (बॅसीलस पॅपीली) व सूत्रकृमी (हेटेरो हॅब्डीटीस) हे हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत. त्यांचाही वापर हुमणी नियंत्रणासाठी होऊ शकतो. रासायनिक नियंत्रणासाठी, उसामध्ये क्लोरपायरीफॉस (२० इसी) १ लिटर प्रति एकरी ४०० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.\
सुरु ऊस
हुमणीच्या जैविक नियंत्रणासाठी बिव्हेरीया बॅसियाना, मेटाराझिम अॅनीसोप्ली, व्हर्टिसिलीयम लेकॅनी उपयुक्त ठरतात. हे जैविक नियंत्रक एकरी २ लिटर/किलो या प्रमाणात शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून, ड्रिपद्वारे किंवा ड्रेंचिंगद्वारे पिकाच्या मुळापाशी द्यावे. जीवाणू (बॅसीलस पॅपीली) व सूत्रकृमी (हेटेरो हॅब्डीटीस) हे हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत. त्यांचाही वापर हुमणी नियंत्रणासाठी होऊ शकतो. रासायनिक नियंत्रणासाठी, उसामध्ये क्लोरपायरीफॉस (२० इसी) १ लिटर किंवा इमिडाक्लोप्रिड + फिप्रोनिल ४० टक्के + ४० टक्के) पाण्यात विरघळणारे दाणेदार कीटकनाशक १८० ते २२० ग्रॅम प्रति एकरी ४०० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.