कृषी सल्ला- कोबीवर्गीय पाणी निजोजन,वेलवर्गीय केवडा रोग व्यवस्थापन


कोबीवर्गीय:- 

कोबीवर्गीय पिकांची मुळे उथळ असतात. आवश्यकतेनुसार जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याच्या पाळ्या वरचेवर नियमितपणे द्याव्यात. गड्डे तयार झाल्यावर पाणी बेताचे द्यावे; अन्यथा गड्डे फुटण्याची शक्‍यता असते. तसेच कोबीवर्गीय पिकांना गड्डा तयार होण्याच्या वेळी पाण्याचा ताण पडू देऊ नये, अन्यथा गड्डे लहान राहतात.


            कृषी सल्ला- कांदा सड व कोंब येणे समस्या,टोमॅटो कॅल्शियम कमतरता निजोजन.


                                                      telegram



वेलवर्गीय:-
केवडा (डाउनी मिल्ड्यू) रोगाची लक्षणे दिसताच, रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत. रोगनियंत्रणासाठी, मेटॅलॅक्‍झिल अधिक मँकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम किंवा अॅझोक्झिस्ट्रॉबीन १ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पुढील फवारणी आवश्यकतेनुसार १० दिवसांच्या अंतराने घ्यावी.जीवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, कॉपर ऑक्सिक्‍लोराईड ३ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.


कृषिक अँप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post