खोडवा व पूर्वहंगामी पीक संरक्षण आणि सुरु ऊस सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन




खोडवा ऊस

पीक संरक्षण
खोडवा पिकामध्ये काणी व गवताळ वाढीचे प्रमाण जास्त आढळते. त्यासाठी अशी काणीग्रस्त बेटे व गवताळ वाढीची बेटे समूळ उपटून नष्ट करावीत.मार्च-एप्रिलमध्ये तुटलेल्या ऊसाचा खोडवा ठेवल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव जास्त दिसतो. ऊसामध्ये खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, एकरी २ ट्रायकोकार्डची १० ते १५ दिवसाच्या अंतराने आवश्यकतेनुसार २ ते ३ प्रसारणे करावीत. खोडकिडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी, क्लोरपायरीफॉस (२० ईसी) १.५ मिलि किंवा सायपरमेथ्रीन (१० ईसी) १.५ मिलि किंवा क्लोरॅनट्रॅनिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मिलि प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी. अन्यथा क्लोरॅनट्रॅनिलीप्रोल (०.४ जीआर) ७.५ किलो किंवा फिप्रोनिल (०.३ जीआर) १० ते १३.३ किलो प्रति एकरी जमिनीमधून वापरावे.
हुमणीच्या नियंत्रणासाठी, वळवाचा पहिला पाऊस झाल्यानंतर निंब, बाभूळ व बोर या झाडावरील भुंगेरे प्रकाश कंदील व रॉकेलचा वापर करून सामुदायिकरित्या रात्रीचे वेळी गोळा करून नष्ट करावेत. तसेच फोरेट (१० जी) १० किलो प्रति एकरी जमिनीमधून वापरावे.कांडी किडीच्या नियंत्रणासाठी एकरी २ ट्रायकोकार्ड्स मोठ्या बांधणीनंतर दर १५ दिवसांनी आवश्यकतेनुसार ऊस तोडणीअगोदर एक महिन्यापर्यंत वापरावीत.



पूर्वहंगामी ऊसपीक संरक्षण

हुमणीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना करावी. रात्रीच्या वेळी कडुलिंब, बोर, बाभूळ या झाडांवर जमा होणारे हुमणीचे भुंगेरे गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा. हा उपक्रम सामुदायिकरीत्या २-३ वेळा राबवावा.उसावर कांडी किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी प्रतिएकरी २ ते ३ ट्रायकोकार्ड्स मोठ्या बांधणीनंतर दर १५ दिवसांनी ऊसतोडणीपूर्वी १ महिन्यापर्यंत लावावीत.पिकावर खवले किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी डायमिथोएट (३० इसी) २.५ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.पांढऱ्या माशीच्या बंदोबस्तासाठी व्हर्टिसिलियम लेकॅनी ४०० ते ८०० ग्रॅम प्रतिएकरी या प्रमाणात फवारणी करावी.ऊस पिकास पायरिलाचा प्रादुर्भाव असल्यास इपरिकॅनिया मेल्यॅनोल्युका या परोपजिवी मित्रकीटकांचे २,००० जिवंत कोष किंवा २०,००० अंडीपुंज प्रतिएकरी वापरावेत.




सुरु ऊस पिकास लागवड करताना सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केला नसल्यास, तसेच माती परीक्षण करून सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास, प्रतिएकरी १० किलो फेरस सल्फेट, ८ किलो झिंक सल्फेट, ४ किलो मँगेनीज सल्फेट आणि २ किलो बोरॅक्स ही सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते १:१० या प्रमाणात चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोष्ट खतामध्ये मिसळून रांगोळी पद्धतीने सरीत द्यावीत.




कृषिक अँप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.
Post a Comment (0)
Previous Post Next Post