फायदेशीर पेरू लागवड तंत्रज्ञान

सौजन्य : श्री. यशवंत जगदाळे, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या),
️               कृषी विज्ञान केंद्र, बारामती
फायदेशीर पेरू लागवड तंत्रज्ञान

• हवामान :
पेरू लागवडीसाठी उष्ण आणि समशीतोष्ण हवामान मानवते. कोरडे, उष्ण हवामान असणाऱ्या प्रदेशात व जिथे हिवाळ्यात थंडी अधिक असते, अशा भागात पेरूचा दर्जा व उत्पादन चांगले मिळते.
• जमिनीची निवड :
पेरू लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी, मध्यम ते भारी जमीन योग्य असते. चांगल्या उत्पादनासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण भरपूर असावे. जमिनीचा सामू ६.५ ते ८.५ दरम्यान असावा. पाण्याचा निचरा न होणाऱ्या पाणथळ जमिनी, मुरमाड व चुनखडीयुक्त जमिनी पेरू लागवडीसाठी अयोग्य असतात.
• सुधारित जाती :
पेरूच्या अलहाबाद सफेदा, सरदार (L – ४९), ललीत, अर्का अमुल्या, चिट्टीदार इ. महत्त्वाच्या जाती आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये सरदार जातीची सर्वाधिक लागवड होते. अलीकडच्या काळात ललित व लाल गर असणाऱ्या जातींना अधिक मागणी मिळते.
• अभिवृद्धी व लागवड :
पेरूच्या अभिवृद्धीसाठी दाब कलम पद्धत वापरली जाते. शासकीय किंवा कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिकेतूनच शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेली, जातीवंत, जोमदार वाढीची, निरोगी, १२ महिने वयाची रोपे घ्यावीत. उन्हाळ्यात एप्रिल-मे महिन्यामध्ये चौरस पद्धतीने ६x६ मीटर अंतरावर ६०x६०x६० सेंमी आकाराचे खड्डे खोदावेत. या खड्ड्यामध्ये शेणखत व पोयटा मातीचे मिश्रण (१;१), २ किलो सिंगल सुपर फॉस्फेट, ५० ते ६० ग्रॅम मिथिल पॅराथिऑन भरून पावसाळ्याच्या सुरुवातीस किंवा जोराचा पाऊस संपल्यानंतर कलमांची लागवड करावी. कलम खड्ड्यांच्या मध्यभागी लावून, कलमाभोवती माती दाबून घ्यावी. लागवडीनंतर ताबडतोब पाणी द्यावे.
घन पद्धतीने लागवड करण्यासाठी बुटक्या वाणांचा वापर करावा. पेरूची ३x२ मीटर अंतरावर लागवड करावी.
अधिक वाचा ‘कृषिक तज्ञ’मध्ये…

कृषिक अँप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा
Post a Comment (0)
Previous Post Next Post