🥜उन्हाळी भुईमुग लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान


सौजन्य : ✍️ संतोष करंजे, विषय विशेषज्ञ (कृषिविद्या),
🏛️ कृषी विज्ञान केंद्र, बारामती


भुईमुग हे तीनही हंगामात घेतले जाणारे तेलबिया पिक आहे. उन्हाळ्यात तुलेनेने कमी क्षेत्र असूनही या कालावधीत असणारे निरभ्र आकाश व भरपूर सूर्यप्रकाश आणि रोग, किडींचा प्रादुर्भाव कमी असल्याने प्रति एकरी सरासरी उत्पादकता अधिक (५६० किलो प्रति एकर) आहे. भुईमूग या पिकापासून जनावरांना सकस चारा, खाद्यतेल, खाद्य (भाजके शेंगदाणे, चिक्की), सकस पेंड व टरफलापासून उत्तम खत मिळत असल्याने हे एक फायदेशीर पिक आहे.
🥜जमीन :
भुईमूग लागवडीसाठी मध्यम; परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी, वाळू व सेंद्रिय पदार्थमिश्रित जमीन योग्य असते. ही जमीन भुसभुशीत असल्यामुळे मुळांची चांगली वाढ होऊन आऱ्या सुलभ रीतीने जमिनीत जाण्यास तसेच शेंगा पोसण्यासाठी मदत होते. भारी व चिकणमातीयुक्त जमिनीत आऱ्या खोलवर जात नाहीत, शेंगा पोसत नाहीत. तसेच काढणीच्या वेळी ओलावा कमी असल्यास शेंगा जमिनीतच राहून उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते.
🥜हवामान :
भुईमुग पिकवाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश व उबदार हवामान उपयुक्त असते. बियाणे उगवण, अंकुर व रोप वाढीसाठी जमिनीतील तापमान १५ अंश सेल्सिअस आणि वातावरणातील तापमान १८ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक अनुकूल असते. फुलधारणेसाठी वातावरणातील तापमान २४ ते २७ अंश सेल्सिअस तापमान मानवते. वातावरणातील तापमान सतत ३३ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिल्यास पराग कणांच्या सजीव क्षमतेवर विपरीत परिणाम होऊन फुलांमध्ये वांझपणायेऊन शेंगधारणा होत नाही. तर जमिनीतील तापमान ३० ते ३४ अंश सेल्सिअसमध्ये शेंगाची वाढ व पोषण चांगले होते. फूलधारणा ते पक्वता या कालावधीत जमीन व वातावरणातील तापमानात वाढ झाल्यास शेंगाच्या संख्येत घट होते.
🥜पूर्वमशागत :
भुईमुगाची मुळे, उपमुळे व मुळांवरील गाठींची योग्य वाढ होण्यासाठी तसेच भुईमुगाच्या शेंगा जमिनीत चांगल्या पोसण्यासाठी जमीन मऊ व भुसभुशीत असावी. जमिनीची खोल (१५ सें.मी.) नांगरट करून घ्यावी. त्यानंतर कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या द्याव्यात.
🥜पेरणीची वेळ :
काही शेतकरी डिसें���रपासून भुईमूग लागवडीस सुरवात करतात; परंतु उन्हाळी हंगामात भुईमुग लागवडीसाठी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी हा कालावधी योग्य आहे. वातावरणातील तापमान १८ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाल्यानंतर पेरणीस सुरवात करावी.
अधिक वाचा 'कृषिक तज्ञ'मध्ये.....

Post a Comment (0)
Previous Post Next Post