🎋सुरु उसाला द्या शिफारशीत खतमात्रा

सौजन्य : ✍️डॉ. प्रीती देशमुख, सौ. जे. पी. खराडे,
🏛️वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.), पुणे

सुरु उसाचा कालावधी १२ महिन्यांचा असल्यामुळे ऊस तोडणी १५ फेब्रुवारीच्या आत होते. त्यामुळे खोडवा उत्तम ठेवता येतो. खोडवा ठेवायचा नसल्यास जमिनीची मशागत करून जमिनीला चार महिने ऊन मिळते. या जमिनीमध्ये खरीप व रब्बी पिके घेऊन पुन्हा सुरू उसाची लागवड करता येते. यामुळे पिकांची चांगली फेरपालट होऊन जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारून सुपीकता राखता येते.सुरु लागवड १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी. यानंतर लागवड झाल्यास जादा तापमानामुळे खोड किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळतो, पर्यायाने उत्पादनही घटते. लागवडीसाठी जास्त साखर उतारा आणि उत्पादन देणाऱ्या को ८६०३२ (नीरा), व्हीएसआय ४३४, कोसा ६७१, एमएस १०००१ आणि व्हीएसआय ०८००५ या जातींची निवड करावी.

🎋सेंद्रिय खतांचा वापर
एकरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत रोटाव्हेटरच्या साहाय्याने जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. त्यानंतर लागणी अगोदर एकरी ५ टन शेणखत आणि रासायनिक खताचा पहिला हप्ता सरीमध्ये मातीत मिसळावा. शेणखत किंवा कंपोस्ट खत पुरेसे नसल्यास प्रेसमड केक, कोंबडी खत, बायोकंपोस्ट, उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पेंडी अशा अनेक पर्यायांनी जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ मिसळता येतात. याचबरोबरीने ताग किंवा धैंचा ही हिरवळीची पिके फायदेशीर ठरतात.
🎋रासायनिक खतांचा वापर
• उसाच्या चांगल्या वाढीसाठी एकरी १०० किलो नत्र, ४६ किलो स्फुरद व ४६ किलो पालाशची शिफारस आहे. माती परीक्षण करून खत मात्रेत योग्य बदल करावा.
• को-८६०३२ या मध्यम उशिरा पक्व होणाऱ्या जातीस अन्नद्रव्यांची गरज जास्त असल्याने या जातीस नत्र, स्फुरद आणि पालाशयुक्त खतांची २५ टक्के जास्त मात्रा म्हणजे १२० किलो नत्र, ५६ किलो स्फुरद व ५६ किलो पालाश प्रतिएकरी द्यावी.
अधिक वाचा 'कृषिक तज्ञ'मध्ये.....
आता मिळवा मोफत कृषि सल्ला, कृषि मार्गदर्शन,व गाव पातळीवरील हवामान अंदाज फक्त कृषि विज्ञान केंद्र बारामतीचे "कृषिक अॅप" वर तर आत्ताच डाऊनलोड करा📲📲
   




Post a Comment (0)
Previous Post Next Post