सौजन्य : ✍️ शरी. यशवंत जगदाळे, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या),
🏛 कषी विज्ञान केंद्र, बारामती
रब्बी हंगामातील हवामान बटाटा पिकास अनुकूल असते. बटाटा पिकाचे ७५ ते १०० दिवसांत चांगले उत्पादन मिळते. रब्बी बटाटा लागवडीसाठी योग्य पाणी व्यवस्थापन आणि सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास उत्पादनात भरघोस वाढ होते. पूर्वहंगामी ऊस पिकामध्ये बटाट्याचे आंतरपीक म्हणूनही किफायतशीर उत्पन्न घेता येऊ शकते.
🥔 हवामान :
बटाटा हे मुळचे शीत हवामानातील पीक आहे. त्यामुळे थंड हवामान पिकवाढीस चांगले मानवते. बटाटा लागण्याच्या व वाढीच्या काळात (लागवडीनंतर ३५ ते ४० दिवसांनी) १७ ते २० अंश सेल्सिअस किमान तापमान, ६५ ते ८० टक्के सापेक्ष आर्द्रता आणि १० तास स्वच्छ सूर्यप्रकाश पिकास आवश्यक असतो.
🥔 लागवडीची वेळ :
रब्बी हंगामात ऑक्टोबरअखेर ते नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत लागवड करावी. काढणी फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत होते.
🥔 जमीन :
बटाटा लागवडीसाठी भुसभुशीत, मध्यम प्रतिची, पाण्याचा चांगला निचरा होणारी, कसदार जमिनीची निवड करावी. जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण भरपूर असावे. जमिनीचा पीएच (सामू) ५ ते ६.५ दरम्यान असावा.
🥔 जातींची निवड :
कुफरी ज्योती - मध्यम, उभट व जोमदार झाड, पांढऱ्या रंगाचे लांबोळे बटाटे, लेट ब्लाईट रोग प्रतिकारक, कालावधी ९०-१०० दिवस, सरासरी उत्प���दन १२ टन प्रति एकर
कुफरी पुखराज - मध्यम ते जोमदार वाढणारे झाड, पिठूळ व फिक्कट पांढऱ्या रंगाचे लांबोळे बटाटे, अर्ली ब्लाईट रोग प्रतिकारक, कालावधी ९०-१०० दिवस, सरासरी उत्पादन १४-१६ टन प्रति एकर
अधिक वाचा 'कृषिक तज्ञ'मध्ये.....
त्वरित पुढे दिलेल्या लिंक वरून कृषिक प्रदर्शन २०२० साठी नोंदणी करून ५०% सवलतीचा लाभ घ्या.📱📲