हरभरा
हरभरा पीक मोहरी, करडई, ज्वारी, ऊस या पिकांबरोबर आंतरपीक म्हणून घेता येते. हरभऱ्याच्या दोन ओळी आणि मोहरी अथवा करडईची एक ओळ याप्रमाणे आंतरपीक घ्यावे. हरभऱ्याच्या सहा ओळी आणि रब्बी ज्वारीच्या दोन ओळी याप्रमाणे आंतरपीक फायदेशीर आहे. उसामध्ये सरीच्या दोन्ही बाजूंस किंवा वरंब्याच्या टोकावर १० सें.मी. अंतरावर हरभऱ्याची एक ओळ टोकण केल्यास हरभऱ्याचे अतिशय चांगले उत्पादन मिळते. त्याबरोबरच हरभऱ्याचा बेवड उसाला उपयुक्त ठरून उसाच्या उत्पादनात वाढ होते. मात्र उसामध्ये हरभरा आंतरपीक घेताना पिकास योग्य प्रमाणात द्यावे लागते. अन्यथा, उसाला मुबलक पाणी दिले असता हरभरा पीक जास्त पाण्यामुळे उभळून जाते.
गहू
सुधारित वाण ⭐️जिरायती पेरणी : पंचवटी (एनआयडीडब्ल्यू-१५), शरद (एकेडीडब्ल्यू-२९९७-१६) ⭐️जिरायती आणि मर्यादित सिंचन : नेत्रावती (एनआयएडब्ल्यू-१४१५), एनआय-४५३९, एन-५९ ⭐️बागायत वेळेवर पेरणी : तपोवन (एनआयएडब्ल्यू-९१७), गोदावरी (एनआयडीडब्ल्यू-२९५), त्र्यंबक (एनआयएडब्ल्यू-३०१), फुले समाधान (एनआयएडब्ल्यू-१९९४), एमएसीएस-६२२२, एचडी-२३८०, एमएसीएस-२४९६, एचडी-२१८९, पूर्णा (एकेडब्ल्यू-१०७९), विमल (एकेएडब्ल्यू-३७२२) ⭐️बागायत उशिरा पेरणी : एनआयएडब्ल्यू-३४, एकेएडब्ल्यू-४६२७, एकेएडब्ल्यू-३८१, एचआय-९९९, फुले समाधान (एनआयएडब्ल्यू-१९९४)
रब्बी ज्वारी
ज्वारीची उगवण झाल्यावर १० ते १२ दिवसांनी विरळणी करून एका ठिकाणी एकच ठोंब ठेवावा. पिकाच्या सुरवातीच्या ३५ ते ४० दिवसांत पीक तणविरहित ठेवावे. पेरणीनंतर आवश्यकतेनुसार १ ते २ वेळा खुरपणी करावी आणि तीन वेळा कोळपणी करावी. पहिली कोळपणी पेरणीनंतर ३ आठवड्यांनी फटीच्या कोळप्याने करावी. या कोळपणीमुळे तणांचा बंदोबस्त होऊन मातीचा थर जमिनीवर तयार होऊन मातीचे आच्छादन तयार होते. दुसरी कोळपणी पेरणीनंतर ५ आठवड्यांनी पासच्या कोळप्याने करावी, त्यामुळे रोपांना मातीचा आधार मिळतो. पीक ८ आठवड्यांचे झाल्यानंतर दातेरी कोळप्याने तिसरी कोळपणी कोळप्याला दोरी बांधून करावी. त्यामुळे जमिनीच्या भेगा बुजण्यास मदत होऊन पिकाच्या मुळांना मातीची भर दिली जाईल व शेतात सऱ्या पडल्यामुळे पावसाचे पाणी धरून ठेवण्यास मदत होईल. या कोळपणीमुळे जमिनीतील ओलाव्याचे बाष्फीभवन न होता जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते.