दुष्काळी स्थितीत आश्‍वासक ठरणारे ‘शुगरबीट’


सौजन्य : ✍️डॉ. मिलिंद जोशी, विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण),

🏛️कषी विज्ञान केंद्र, बारामती, जि. पुणे

सध्याच्या दुष्काळी स्थितीत वा बदलत्या हवामानात शर्कराकंद (शुगरबीट) हे पीक शेतकऱ्यांसाठी आश्‍वासक ठरणारे आहे. कमी पर्जन्यमानात ते चांगले उत्पादनक्षम आहे. त्यावर किडी- रोगांचा प्रादुर्भावही तुलनेने कमी असतो. कमी उत्पादन खर्चात हे पीक चांगले उत्पन्न व त्याचबरोबर चाराही देणारे आहे.
भारतात १९६० च्या दशकात शुगरबीट पिकाची लागवड झाली. केंद्रिय ऊस संशोधन केंद्र, लखनौ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे व विभागीय ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव या संस्था शुगरबीटवर संशोधन करीत आहेत. देशात पंजाब, कर्नाटक, तमिळनाडू, राजस्थान, पश्चिम बंगालमध्ये लागवड केली जाते.
     
☺️सध्याच्या काळात होऊ शकते पर्यायी पीक
सध्याच्या बदलत्या हवामानात हे पीक शेतकऱ्यांसाठी आश्‍वासक ठरू शकते. त्याची कारणे पुढीलप्रमाणे...
• कमी पाण्यात वा पर्जन्यमानात चांगले उत्पादन (साधारण एकरी ३५ ते ४० टन)
• कीड व रोगांचा प्रादुर्भाव अन्य पिकांच्या तुलनेत कमी
• पिकातील साखरेचे प्रमाण जवळपास १२ ते १५ टक्के
• चोपण वा क्षारपड जमिनींमध्ये उत्कृष्ट उत्पादन
• जमिनीतील क्षार व अन्य हानीकारक घटक शोषून घेऊन जमीन सुपीक बनवते
• साखर, इथेनॉल व पशुखाद्य निर्मिती
• दुभत्या जनावरांना खाद्य म्हणून दिल्यास साधारणपणे अर्धा लिटर प्रति दिन प्रति गाय उत्पादन वाढू शकते
• दुधाच्या गुणवत्तेत सुधारणा
• पीक कालावधी सुमारे ४ ते ५ महिने
अधिक वाचा 'कृषिक तज्ञ'मध्ये.....
\

Post a Comment (0)
Previous Post Next Post