ऊस लागवड सल्ला| आडसाली ऊस,सुरु ऊस |- krushikapp

 आडसाली ऊस
आडसाली ऊस

लागवडीनंतर ३ ते ४ दिवसांनी जमीन वाफश्‍यावर असताना, एकरी २ किलो  किंवा मेट्रीब्युझिन एकरी ६०० ग्रॅम प्रति ४०० लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर फवारणी करावी. फवारणी करताना जमीन तुडवली जाणार नाही याची काळजी घ्यावी. आंतरपिके असल्यास शिफारशीप्रमाणे तणनाशके फवारावीत. ऊस उगवणीनंतर हरळी किंवा लव्हाळा या तणांचा प्रादुर्भाव आढळल्यास, ग्लायफोसेट (४१ एसएल) ८ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून जमिनीलगत फवारणी करावी. उसावर तणनाशक पडू नये, यासाठी प्लॅस्टिक हुडचा वापर करावा. उगवणीनंतर ६० ते ७० दिवसांनी २, ४-डी (क्षार स्वरुपातील) ५०० ग्रॅम प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून तणावर फवारणी करावी. तसेच आवश्‍यकतेनुसार कृषीराजसारख्या औजारे किंवा खुरपणीद्वारे तणनियंत्रण करावे.











सुरु ऊस

सुरु ऊस
अंशत: पाण्याखाली बुडालेल्या ऊस पिकाचे संभाव्य नुकसान टाळून पिकाची सुधारणा करणे शक्य असून त्यासाठी खालील उपाय योजना केली पाहिजे. अंशत: बुडालेल्या उसातील पाण्याचा निचरा त्वरीत करावा. उताराच्या बाजूने चर काढावेत. गरज भासल्यास पंपाच्या साहाय्याने पाणी शेतीबाहेर काढावे. अंशत: बुडालेल्या उसामध्ये काही ऊस वाळलेला किंवा कुजलेला असेल तर तो काढावा. जुनी वाळलेली व कुजलेली पाने काढावीत. पूरग्रस्त शेतातील अन्नद्रव्याचा ऱ्हास झाल्यामुळे पिकाची पुढील काळात चांगली वाढ होण्यासाठी, एकरी २४ किलो नत्र (५२ किलो युरिया), १६ किलो पालाश (३० किलो म्युरेट ऑफ पोटॅश) व मायक्रोसोल ५ किलोची मात्रा द्यावी. त्याचप्रमाणे फवारणीद्वारे २ टक्के डीएपी अधिक १ टक्के युरिया अधिक ०.५ टक्के म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. शेतातील पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागल्यास अशा उसावर द्रवरूप रासायनिक खतांची (मल्टिमॅक्रोन्युट्रियंट, मल्टिमायक्रोन्युट्रियंट) प्रत्येकी २.५ लिटर अधिक वसंत उर्जा जैवसंजीवक १ लिटर २५० लिटर पाण्यातून पानांवर फवारणी करावी. नत्र स्थिर करणाऱ्या व स्फुरद विरघळविणाऱ्या जीवाणू खतांचा (अॅझो फॉस्फो/ सॉईल हेल्थ) ५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी. तसेच अॅसिटोबॅक्टर किंवा प्लान्ट हेल्थ जीवाणू खतांची ५ मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

                               कृषक अँपलिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटन क्लिक करा  
Post a Comment (0)
Previous Post Next Post