| 🌾 भात पिकाचे रोग व्यवस्थापन | krushik app

🌾भात पिकाचे रोग व्यवस्थापन 
| भात पिकाचे रोग व्यवस्थापन | krushik app

सौजन्य : ✍डॉ. चंद्रशेखर क्षीरसागर
✍डॉ. नरेंद्र काशीद
कृषी संशोधन केंद्र, वडगाव मावळ
भातावर करपा, पर्ण करपा आणि कडा करपा हे प्रमुख तीन प्रकारचे करपा रोग येतात. यांपैकी करपा आणि पर्ण करपा हे रोग बुरशीजन्य, तर कडा करपा अणुजीवांमुळे होणारा रोग आहे. तसेच तपकिरी ठिपके, आभासमय काजळी आणि उदबत्ता हे रोग कमी-अधिक प्रमाणात पडतात.
🌾करपा : भातपिकावर करपा रोगाची लागण अगदी रोपावस्थेपासून ते पीक पक्वतेच्या काळात कोणत्याही अवस्थेत पान, खोड, पेरे व लोंबीच्या मानेवर होते. या रोगामुळे पानावर लंबगोलाकार म्हणजेच मध्यभाग रुंद व दोन्ही कडांना निमुळते होत जाणारे असंख्य ठिपके पडतात. ठिपक्यांचा मध्य राखाडी रंगाचा व कडा गर्द तपकिरी रंगाचा असतो. ठिपक्यांचा आकार आणि रंग यावरून हा रोग ताबडतोब ओळखता येतो. रोगाचा प्रादुर्भाव जास्त असल्यास अनेक ठिपके एकत्र मिसळून पाने मोठ्या प्रमाणावर करपतात. पानाप्रमाणेच पेरे आणि लोंबीच्या दांड्यावरसुद्धा रोग येतो; त्यामुळे रोगट ठिकाणी पेरे आणि मान मोडून लोंबीत दाणे भरत नाहीत.
या रोगाचा प्रथम प्रादुर्भाव हा रोगट बियाण्याद्वारे व शेतातील दुय्यम प्रसार हवेमार्फत होतो. जास्त प्रमाणात नत्र खतांचा वापर, जास्त काळ पानावर साठणारे दव, जास्त सापेक्ष आर्द्रता (९० ते ९२ टक्के), अधूनमधून हलका पाऊस, ढगाळ हवामान तसेच दाट लागवड रोगाचा प्रादुर्भाव आणि वाढीसाठी या बाबी अनुकूल आहेत.
🌾पर्ण करपा (पान टकल्या) : या रोगाचा प्रादर्भाव जवळ जवळ संपूर्ण राज्यामध्ये क���ी-अधिक प्रमाणात दिसून येतो. लागवड झाल्यानंतर साधारणत: एक ते सव्वा महिन्याने पर्ण करपा रोगाची लागण होते. सुरवातीला पानाचे टोक किंवा कडेवर अर्धवर्तुळाकार फिकट ठिपके येतात. पर्ण करपा रोगामुळे मुख्यतः पानाचे शेंडे करपतात. हळूहळू ठिपके रुंद होत जाऊन तपकिरी होतात. परंतु, कधी कधी मधील भागसुद्धा करपलेला दिसतो. थोड्याच दिवसांत करपलेला भात राखाडी रंगाचा दिसतो आणि या भागात सनमायकावरील नक्षीप्रमाणे एकमेकांना समांतर अशी फिकट तपकिरी वलये दिसतात. रोगाचा प्रथम प्रादुर्भाव रोगट बियाणे तसेच शेतातील दुय्यम प्रसार हवेमार्फत होतो. रोग वाढण्याची कारणे करपा रोगाप्रमाणेच आहेत.
अधिक वाचा 'कृषिक तज्ञ'मध्ये.....
                                 कृषक अँपलिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटन क्लिक करा                           
Post a Comment (0)
Previous Post Next Post