पशु संवर्धन | पूरपरिस्थितीत पशूधन व्यवस्थापन | krushikapp



अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती झालेल्या भागात पशुधनामध्ये मोठया प्रमाणात मरतूक होण्याची शक्यता असते. मृत पशुधनाची वेळेवर योग्य विल्हेवाट लावण्यात आली नाही तर मानवी व इतर पशुधनाच्या आरोग्यास धोकादायक ठरू शकते. मृत पशधनाची विल्हेवाट लावण्यासाठी शास्त्रीय पध्दतीचा अवलंब करावा. पशुधनाच्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी मनुष्यवस्तीपासून दूर जागेची निवड करावी. ही जागा कोणत्याही पाण्याच्या स्रोतापासून ५०० फुटाच्या परिघात नसावी. मोठया मृत पशुधनाची विल्हेवाट लावण्यासाठी किमान ८x६x८ फूट; तर लहान मृत पशधनाची विल्हेवाट लावण्यासाठी ६x४x६ फूट खड्डा करावा. त्यामध्ये तळाशी एक इंच चुन्याचा थर द्यावा. त्यावर मृत जनावर ठेऊन वर पुन्हा चुन्याचा थर द्यावा. चुना उपलब्ध न झाल्यास ब्लिचिंग पावडरचा उपयोग करावा. खड्डा बुजवताना मृत पशुधनाच्यावर किमान ३ फूट मातीचा थर असावा. मृत शरीर कुजण्याची क्रिया लवकर पुर्ण होण्यासाठी शक्य असल्यास मृत जनावरावर सेंद्रीय पदार्थ (उदा. ईएम सोलुशन फवारणी, पालापाचोळा इ) टाकण्यात यावेत. गावातील भटकी कुत्री/इतर वन्य प्राण्यांनी मृत पशुधनाचे उकरणे टाळण्यासाठी या जागेभोवती तात्पुरत्या स्वरूपात काटेरी कुंपण तयार करावे. पशुधनाची मरतूक झालेल्या जागेभोवती निर्जंतुकीकरणासाठी जंतुनाशक फवारणी, ब्लिचिंग पावडरचा योग्य प्रमाणात वापर करावा. तसेच संसर्गजन्य रोगाचा प्रसार टाळण्यासाठी पशुधनाचा गोठा, पक्षीगृहे इ परिसरात जंतुनाशक द्रावणाची फवारणी (२-४% सोडीयम हायपोक्लोराईट, फिनाईल इ) करावी. गावात मोठया प्रमाणात मरतूक झाली असल्यास विल्हेवाट लावण्यासाठी शक्यतो एकाच जागेची निवड करावी. मृत पशुधनाच्या विल्हेवाटीसाठी कार्यरत व्यक्तींनी स्वतःच्या आरोग्य रक्षणासाठी पर्सनल प्रोटेक्शन किट वापरावे. मृत पशूधनाचे मालक जागेवर उपलब्ध नस���ील त्यांचे कानात टॅग असल्यास त्याचा क्रमांक तसेच पशुधनाचे वर्णनाची नोंद ठेवावी आणि छायाचित्र (तोंड व दोन्ही बाजूंचे) काढून ठेवावे.

कृषक अँपलिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटन क्लिक करा 


Post a Comment (0)
Previous Post Next Post