|पूरग्रस्त परिस्थितीत ऊस पीक व्यवस्थापन |- Krushik App

 कृषिशास्त्र व तंत्रज्ञान विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट,
मांजरी (बु.), ता. हवेली, जि. पुणे- ४१२३०७

 ऊस हे महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक असून राज्यामध्ये दरवर्षी ८ ते १० लाख हेक्‍टर क्षेत्रावर घेतले जाते. चालू वर्षी जुलै, ऑगस्ट २०१९ मध्ये झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेली पूर परिस्थिती यामुळे ऊस पिकविणाऱ्या प्रमुख जिल्ह्यांत मागील ८ ते १० दिवसांपासून नदीकाठी असणारे ऊस क्षेत्र अंशतः ते पूर्णतः पाण्यात बुडाले होते. दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा; मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे, अहमदनगर आणि नाशिक तसेच उत्तरपूर्व महाराष्ट्रातील काही ठिकाणी ऊस क्षेत्र अतिवृष्टी आणि तेथील नद्यांना आलेल्या पूरामुळे बाधित झालेले आहे.
 • पूरग्रस्त परिस्थितीत ऊस पिकाचे नुकसान खालीलप्रमाणे होते : 
१. पूरग्रस्त जमिनीमध्ये प्राणवायूचे प्रमाण कमी झाल्यामुळे जमिनीतील नत्र, स्फुरद व इतर अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी झाल्यामुळे उसाची पाने पिवळसर होतात व वाढ खुंटते. मुळांची कार्यक्षमता घटते व त्यामुळे ती जमिनीतील अन्नद्रव्य व पाणी शोषून घेऊ शकत नाहीत. वाहून आलेला गाळ जमिनीवर साचतो. उभ्या उसास कांड्यावर मुळ्या फुटतात. पर्ण छिद्रातून होणाऱ्या बाष्पीभवन व कर्बग्रहण क्रिया मंदावतात. त्यामुळे उसाची वाढ खुंटते.
२. पूर्णपणे बुडालेल्या उसाच्या शेंड्यात माती व पाणी शिरल्यामुळे उसाचा वाढणारा कोंब कुजतो व उसाला मुळ्या व पांगशा फुटतात. एक आठवड्यापेक्षा जास्त काळ पाण्यात बुडालेल्या उसाची पाने वाळतात आणि ऊस कुजतो. शेंडे न कुजलेल्या उसाची पूर ओसरल्यानंतर वाढ परत सुरू होते. नवीन लागवडीत ७ दिवसांपेक्षा जास्त काळ पाणी राहिल्यास बहुसंख्य डोळे कुजल्याने उगवण फारच कमी होते.
३. पूरग्रस्त क्षेत्रात पाण्याच्या प्रवाही भागात ऊस लोळण्याचे प्रमाण वाढते.
४. पूरग्रस्त उसामध्ये मर, मूळ कूज, पाईनॅपल, पोक्का बोंग, तांबेरा व पानांवरील ठिपके या रोगांचा प्रादुर्भाव होतो.
५. लष्करी अळी, गोगलगाय, नाकतोडे, पांढरी माशी, कांडी व शेंडे कीड, पिठे कीड यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव वाढतो.
६. पूरग्रस्त उसाच्या उत्पन्नामध्ये उसाच्या वाढीच्या अवस्थेनुसार, पुराच्या प्रमाणानुसार, बुडीत कालावधीनुसार आणि रोग व कीडींच्या प्रादुर्भावानुसार कमी-अधिक प्रमाणात नुकसान/ घट होते.
७. शेतातील माती मोठ्या प्रमाणावर पुरामुळे वाहून जाने व पाण्यातून येणारी माती शेतात साचणे यामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म बदलतात.
|पूरग्रस्त परिस्थितीत ऊस पीक व्यवस्थापन |- Krushik App


अधिक वाचा कृषिक अॅप मधील  'कृषिक तज्ञमध्ये...
                         
                         कृषक अँपलिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटन क्लिक करा 

Post a Comment (0)
Previous Post Next Post