कृषी सल्ला | आडसाली ऊस,खोडवा ऊस,सुरु ऊस| - krushikapp


आडसाली ऊस 
आडसाली ऊस- krushikapp
आडसाली उसाचा कालावधी १६ ते १८ महिन्यांचा असतो. उसाची लागवड केल्यानंतर पूर्ण उगवण होण्यासाठी तीन ते सहा आठवड्यांचा कालावधी लागतो. सुरवातीच्या कालावधीमध्ये उसाची वाढ हळू होत असल्यामुळे उसाच्या दोन सऱ्यांमध्ये आंतरपिके घेण्यासाठी भरपूर मोकळी जागा असते. आंतरपिकांमुळे एकूण निव्वळ उत्पन्नात वाढ होते. उसासाठी बियाणे, खते व आंतरमशागतीसाठी केलेला खर्च आंतरपिकाच्या उत्पन्नातून निघून जातो. तणांच्या वाढीवर परिणाम होऊन तणांचे प्रमाण कमी होते. द्विदल वर्गातील आंतरपिके घेतल्यास जमिनीचा पोत सुधारतो. आडसाली ऊस पिकामध्ये खरीप हंगामातील भुईमूग, चवळी, सोयाबीन, भाजीपाला इ. आंतरपिके घेता येतात. भुईमूग हे आंतरपीक घेताना फुले प्रगती, एस.बी. ११, फुले व्यास, फुले उनप, टॅग-२४, टी.जी. २६ या जाती वापराव्यात. सोयाबीन आंतरपीक घेतल्यास जे.एस. ३३५ किंवा फुले कल्याणी या जातींचा वापर करावा. जमिनीच्या सुपिकतेसाठी ताग, धैंचा यासारख्या हिरवळीच्या पिकांचा आंतरपीक म्हणून समावेश करता येतो. बाळबांधणीच्या वेळी ही पिके सरीमध्ये गाडून बाळबांधणी करता येते. ऊस लागण पट्टा पद्धतीने (२.५-५ किंवा ३-६ फूट) असल्यास आंतरपीक चांगल्या प्रकारे घेता येते. आंतरपिकासाठी व्यापलेल्या क्षेत्रानुसार त्या पिकाची शिफारशीत खत मात्रा वेगळी द्यावी.
सपूर्ण महितीसाठी खालील विडियो पहा

खोडवा ऊस
खोडवा ऊस- krushikapp
हुमणीच्या जैविक नियंत्रणासाठी बिव्हेरीया बॅसियाना, मेटाराझिम अॅनीसोप्ली, व्हर्टिसिलीयम लेकॅनी उपयुक्त ठरतात. हे जैविक नियंत्रक एकरी ८ किलो या प्रमाणात शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून, ड्रिपद्वारे किंवा ड्रेंचिंगद्वारे पिकाच्या मुळापाशी द्यावे. जीवाणू (बॅसीलस पॅपीली) व सूत्रकृमी (हेटेरो-हॅब्डीटीस) हे हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत. त्यांचाही वापर हुमणी नियंत्रणासाठी होऊ शकतो. रासायनिक नियंत्रणासाठी, उसामध्ये क्लोरपायरीफॉस (२० इसी) २ लिटर प्रति एकरी ४०० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
सपूर्ण


 सुरु ऊस - krushikapp
हुमणीच्या जैविक नियंत्रणासाठी बिव्हेरीया बॅसियाना, मेटाराझिम अॅनीसोप्ली, व्हर्टिसिलीयम लेकॅनी उपयुक्त ठरतात. हे जैविक नियंत्रक एकरी ८ किलो या प्रमाणात शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून, ड्रिपद्वारे किंवा ड्रेंचिंगद्वारे पिकाच्या मुळापाशी द्यावे. जीवाणू (बॅसीलस पॅपीली) व सूत्रकृमी (हेटेरो-हॅब्डीटीस) हे हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत. त्यांचाही वापर हुमणी नियंत्रणासाठी होऊ शकतो. रासायनिक नियंत्रणासाठी, उसामध्ये क्लोरपायरीफॉस (२० इसी) २ लिटर किंवा इमिडाक्लोप्रिड + फिप्रोनिल (४० टक्के + ४० टक्के) पाण्यात विरघळणारे दाणेदार कीटकनाशक १८० ते २२० ग्रॅम प्रति एकरी ४०० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
                            कृषक अँपलिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटन क्लिक करा

Post a Comment (0)
Previous Post Next Post