कृषि सल्ला-| कांदा,टोमॅटो तसेच वेल वर्गीय पिके - krushikApp|


कांदा 

कांदा पिकाला पाण्याचे प्रमाण आणि दोन पाळींतील अंतर हे पिकाची वाढीची अवस्था, लागवडीचा हंगाम, जमिनीचा मगदूर इत्यादी वर अवलंबून असते. पिकाला पाणी देताना १५ सेंमीपेक्षा जास्त खोलवर ओल जाईल असे पाणी देण्याची गरज नाही. सुरवातीच्या काळात पिकाला बेताचे पाणी लागते. कोरड्यात लागवड केल्यास पाठोपाठ पाणी द्यावे. कोरडी किंवा ओली लागवड केल्यानंतर दोन दिवसांनी चिंबवणी द्यावी. खरीप कांद्यास क्वचितच पाणी देण्याची गरज पडते. पावसात खंड पडला तर ठिबक किंवा तुषार सिंचनाद्वारे एक-दोन वेळा पाणी द्यावे. काढणीपूर्वी दोन आठवडे अगोदर पाणी बंद करावे. त्यामुळे कांदा पोसतो, सड कमी होते, माना जाड होत नाहीत.
वेल वर्गीय पिके 🍃

काकडी, दुधी भोपळा, कारली पिकांना प्रत्येकी १० किलो नत्र (२२ किलो युरिया) प्रति एकरी लागवडीनंतर ३० व ४५ दिवसांनी द्यावे. एकूण खतमात्रा प्रति एकरी ४० किलो नत्र, २० किलो स्फुरद, २० किलो पालाश अशी असून, नत्राची अर्धी मात्रा आणि स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा लागवडीसोबत देण्याची शिफारस आहे. दोडका पिकाला प्रत्येकी ७ किलो नत्र (१५ किलो युरिया) प्रति एकरी लागवडीनंतर ३०, ४५ व ६० दिवसांनी द्यावे. एकूण खतमात्रा प्रति एकरी ४० किलो नत्र, २० किलो स्फुरद, २० किलो पालाश अशी असून, नत्राची अर्धी मात्रा आणि स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा लागवडीसोबत देण्याची शिफारस आहे. वरखताच्या मात्रा बांगडी पद्धतीने झाडाच्या बुंध्यापासून थोड्या अंतरावर मुळांच्या क्षेत्रात द्यावे. खते दिल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे.
टोमॅटो 🍅 


टोमॅटोमध्ये नत्राची उर्वरित अर्धी मात्रा (६० किलो नत्र - १३० किलो युरिया) चार समान हप्त्यांत विभागून (प्रत्येकी ३२ किलो युरिया) पुनर्लागवडीनंतर १५, २५, ४० व ५५ दिवसांनी बांगडी पद्धतीने झाडाच्या बुंध्यापासून थोड्या अंतरावर मुळाच्या क्षेत्रात द्यावी. वरखते दिल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे. टोमॅटोमध्ये मध्यम प्रकारच्या जमिनीत संकरीत वाणांसाठी प्रति एकरी १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ६० किलो पालाश देण्याची शिफारस असून; यापैकी निम्मे नत्र (६० किलो नत्र - १३० किलो युरिया), संपूर्ण स्फुरद (६० किलो स्फुरद - ३७५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट), संपूर्ण पालाश (६० किलो पालाश - १०० किलो म्युरेट ऑफ पोटॅश) यासोबतच ८० किलो निंबोळी पेंड पुनर्लागवडीच्या वेळी देणे आवश्यक असते.

                          कृषक अँपलिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटन क्लिक करा
             
Post a Comment (0)
Previous Post Next Post