शाश्वत शेतीसाठी जैविक नियंत्रण भाग – २


शाश्वत शेतीसाठी जैविक नियंत्रण भाग – २

सौजन्य : ✍डॉ. मिलिंद जोशी, विषय विशेषज्ञ (पिक संरक्षण),
               कृषी विज्ञान केंद्र, बारामती


क्रमशः...
रासायनिक कीटकनाशकांच्या वापरामुळे कीड नियंत्रण प्रभावी ठरले आहे. मात्र, बेसुमार वापरणे किडीच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ, मित्र कीटकांचा नाश, दुय्यम किडींचा उद्रेक, पर्यावरणास हानी आदी दुष्परिणाम दिसू लागले. त्यावर जाविक कीड नियंत्रण, ही शाश्वत शेतीची गुरुकिल्ली आहे.
    सूक्ष्म जीवजंतू/रोगकारके :
साथीचे रोग पसरवणाऱ्या सूक्ष्म जीवजंतूंचे प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून त्यापासून रोगजंतूयुक्त जैविक कीड-रोगनाशके तयार केली जातात आणि त्याचा शेतात वापर केला जातो.
 जीवाणू :
१) बॅसिलस थुरीनजेन्सीस (बीटी) : या जीवाणूंचा उपायोग पतंगवार्गीय किडी उदा. कपाशीवरील बोंडअळी, घाटे अळी, कोबीवरील चौकोनी ठिपक्याचा पतंग, पाने गुंडाळणारी अळी, तंबाखूवरील अळी, लिंबूवर्गीय फळझाडांवरील हिरवी अळी आदींच्या नियंत्रणासाठी होतो. भाजीपाला, नगदी पिके, फळझाड���, फुलझाडे इ. पिकांमध्ये वापर करता येतो.
प्रमाण : ०.८ ते १ किलो प्रति एकर फवारणीसाठी वापरावे.
२) स्युडोमोनास फ्ल्युरोसेंस : याचा उपयोग सर्व पिकांवरील बुरशीजन्य व जीवाणूजन्य कूज, मूळकूज, फळकूज, पानांवरील ठिपके इ. रोगांच्या नियंत्रणासाठी होतो. डाळींबावारील नुकसानकारक तेलकट डाग रोगाच्या नियंत्रणासाठी हा जीवाणू अत्यंत उपयुक्त आहे.
प्रमाण : १० ग्रॅम प्रति किलो बियाणे (बीजप्रक्रीयेसाठी), २५ ग्रॅम प्रति १० लिटर (फवारणीसाठी) किंवा ४ किलो प्रति एकर (जमिनीमधून)
फवारणीसाठी ०.५ ते १ किलो स्युडोमोनास पावडर ५ लिटर पाण्यात मिसळून घ्यावी. हे द्रावण गाळून घेतल्यानंतर ४० मिली स्टीकर/स्प्रेडर मिसळावे. हे द्रावण १९५ लिटर पाण्यात मिसळून एक एकर क्षेत्रावर फवारणीसाठी वापरावे. रोगाचा प्रादुर्भाव दिसताच ८ ते १० दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. जमिनीतून वापरासाठी २ किलो स्युडोमोनास शेणखतात मिसळून जमिनीत द्यावे. जमिनीत देताना वर्षातून किमान २ वेळा (३ महिने अंतराने) द्यावे.
अधिक वाचा 'कृषिक तज्ञ'मध्ये...
                         
                                    कृषक अँपलिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटन क्लिक करा 

Post a Comment (0)
Previous Post Next Post