ऊस पिक सल्ला - ( पूर्वहंगामी ऊस, खोडवा ऊस,सुरु ऊस)- krushik app

 पूर्वहंगामी ऊस     
उसावर कांडी किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी प्रतिएकरी २ ते ३ ट्रायकोकार्ड्स मोठ्या बांधणीनंतर दर १५ दिवसांनी ऊसतोडणीपूर्वी १ महिन्यापर्यंत लावावीत. ऊस पिकास पायरिलाचा प्रादुर्भाव असल्यास, इपरिकॅनिया मेल्यॅनोल्युका या परोपजिवी मित्रकीटकांचे २,००० जिवंत कोष किंवा २०,००० अंडीपुंज प्रतिएकरी वापरावेत. पिकावर खवले किडीचा प्रादुर्भाव असल्यास, नियंत्रणासाठी डायमिथोएट (३० इसी) २.५ मिलि प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पांढऱ्या माशीच्या बंदोबस्तासाठी व्हर्टिसिलियम लेकॅनी ४०० ते ८०० ग्रॅम प्रतिएकरी या प्रमाणात फवारणी करावी.

खोडवा ऊस
खोडवा ठेवताना सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केला नसल्यास, तसेच माती परीक्षण करून सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास, प्रतिएकरी १० किलो फेरस सल्फेट, ८ किलो झिंक सल्फेट, ४ किलो मँगेनीज सल्फेट व २ किलो बोरॅक्स ही सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते १:१० या प्रमाणात चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोष्ट खतामध्ये मिसळून ४ ते ५ दिवस सावलीत मुरवून वापरावीत.


सुरु ऊस

सुरु ऊस पिकास लागवड करताना सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केला नसल्यास, तसेच माती परीक्षण करून सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास, प्रतिएकरी १० किलो फेरस सल्फेट, ८ किलो झिंक सल्फेट, ४ किलो मँगेनीज सल्फेट आणि २ किलो बोरॅक्स ही सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते १:१० या प्रमाणात चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोष्ट खतामध्ये मिसळून रांगोळी पद्धतीने सरीत द्यावीत.



               कृषिक अँपलिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटन क्लिक करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
Post a Comment (0)
Previous Post Next Post