पिक सल्ला - भात, सोयाबीन,कापूस(krushikapp)

भात
भातपिकाच्या सुधारित अथवा संकरीत वाणांचे बियाणे शासकीय यंत्रणेकडून अथवा कृषी विद्यापीठाच्या विक्री केंद्राकडून खरेदी करावे. लागवडीसाठी योग्य, शुद्ध, निरोगी आणि दर्जेदार बियाणे वापरावे. बियाणे खरेदी करताना योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. बियाणे मान्यताप्राप्त व योग्य त्या प्रकारचे खरेदी करावे. बियाण्याच्या पिशवीवर लेबल व सील असावे. लेबलवर संबधित अधिकाऱ्यांची सही असावी. बियाणे खरेदीची पावती घ्यावी. लेबलवर बियाणाची जात, प्रकार, लॉट नंबर, उगवण शक्ती, अनुवांशिक शुद्धता, बियाणे वापराचा अंतिम दिनांक याचा उल्लेख असावा. लावणी पद्धतीसाठी १४ ते १६ किलोग्रॅम/ एकर बियाणे लागते. संकरित जातींसाठी एकरी ८ किलोग्रॅम बियाणे पुरेसे असते. विद्यापीठनिहाय सुधारित जाती • मफुकृवि, राहुरी इंद्रायणी, फुले समृद्धी, फुले राधा, भोगावती, फुले आरडीएन-६ • डॉ बासाकोकृवि, दापोली हळवा गट : कर्जत-१८४, रत्नागिरी-७११, रत्नागिरी-२४, कर्जत-३, कर्जत-७, रत्नागिरी-५ निमगरवा गट : कर्जत-५, पालघर-१, कर्जत-६ गरवा गट : रत्नागिरी-२, रत्नागिरी-३, कर्जत-२, कर्जत-८ संकरीत गट : सह्याद्री, सह्याद्री-२, सह्याद्री-३, सह्याद्री-४, सह्याद्री-५ खार जमिनीसाठी : पनवेल-१, पनवेल-२, पनवेल-३ • डॉ पंदेकृवि, अकोला हळवा गट : साकोली-६, सिंदेवाही-१ निमगरवा गट : साकोली-७, पिकेव्ही गणेश, पिकेव्ही खमंग गरवा गट : साकोली-६, सिंदेवाही-४, सिंदेवाही-५, पिकेव्ही मकरंद • वनामकृवि, परभणी हळवा गट (पेरसाळ) – प्रभावती, पराग, अंबिका, तेरणा


सोयाबीन
सोयाबीन सुधारित वाण : एम.ए.सी.एस. १३, एम.ए.सी.एस. ५८ ,एम.ए.सी.एस. १२४, एम.ए.सी.एस. ४५०, एम.ए.सी.एस. ११८८, फुले कल्याणी (डी.एस. २२८), फुले अग्रणी, जे.एस.९३-०५, जे.एस ९७-५२, जे.एस ९५-६०, एन.सी.आर ३७, एम.ए.यु.एस. ४७, एम.ए.यु.एस. ६१, एम.ए.यु.एस. ६१-२, एम.ए.यु.एस. ७१, एम.ए.यु.एस. ८१, एम.ए.यु.एस. १५८, जे.एस. ३३५, टी.ए.एम.एस. ९८-२१. सोयाबीनची उगवणशक्ती ७० टक्क्यांच्या वर असल्यास एकरी ३० किलो बियाणे वापरावे. सोयाबीन बीयाण्याची उगवणशक्ती कमी होण्याची कारणे : सोयाबीनची उगवणशक्ती साठवणुकीमध्ये कमी होत जाते. त्यामुळे एक वर्षाच्यावर साठवणूक केलेले बियाणे उगवणशक्ती तपासल्याशिवाय पेरणीस वापरू नये. कडक उन्हात बियाणे वाळवून साठवल्यास उगवणशक्ती कमी होते. मळणीयंत्राची गती ४०० आर.पी.एम. पेक्षा अधिक असल्यास बियाण्यातील अंकुरास धक्का लागतो व त्याचा परिणाम उगवणशक्तीवर होतो. साठवणुकीमध्ये पोत्यांची एकमेकांवर थप्पी लावल्यास खालच्या पोत्यातील बियाण्यांची उगवणशक्ती कमी होते. म्हणून जास्तीत जास्त ५ पोत्यांची थप्पी असावी

कापूस
बीटी कपाशीचा वाण निवडताना कोरडवाहू किंवा बागायती लागवडीचा प्रकार व वाणाचे गुणधर्म यांचा विचार करावा. आपल्या भागात उत्पादनात सरस असणारा वाण निवडावा. रस शोषण करणाऱ्या किडींना सहनशील वा प्रतिकारक्षम संकरीत वाण असावा. पाण्याचा ताण सहन करणारा वाण निवडावा. बोंडाचा आकार बागायती लागवडीसाठी मोठा व कोरडवाहू लागवडीसाठी मध्यम असावा. शेवटपर्यंत पाने हिरवी राहिल्यास अन्न तयार करण्याचे काम अखेरपर्यंत चालते. त्यामुळे उशिरा लागणाऱ्या बोंडांचासुद्धा आकार मोठा राहतो व बोंडे फुटण्याचे प्रमाण वाढते. बोंडे चांगली फुटणारी असावीत. धाग्याची प्रत चांगली असणारा वाण निवडावा ज्यामुळे कपाशीला दर चांगला मिळू शकेल. रोगांना (मर, दहिया इ.) बळी न पडणारा वाण निवडावा. बागायती लागवडीसाठी उशिरा येणारे तर कोरडवाहू लागवडीसाठी लवकर तयार होणारे वाण निवडावे. वरील गुणधर्माप्रमाणे आपला मागील हंगामातील अनुभव तसेच अन्य शेतकऱ्यांकडील पीक पाहून वाणाची निवड करावी. बाजारात उपलब्ध असणाऱ्या उत्पादनक्षम वाणांचे त्यांच्या गुणधर्मानुसार योग्य नियोजन व व्यवस्थापनानुसार लागवड केल्यास निश्चितपणे चांगले उत्पादन मिळू शकते. अधिक उत्पादन मिळवण्यासाठी विशिष्ट वाणाची लागवड करणे हा एकमेव पर्याय नाही. लागवड करण्यात आलेल्या वाणाच्या जोडीस त्याच्याशी अनुरूप लागवड तंत्राची जोड मिळणे आवश्यक आहे.
                     कृषक अँपलिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटन क्लिक करा
        
Post a Comment (0)
Previous Post Next Post