पशू सल्ला- पशुपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन (krushik App)


पशुपालन: ☆अॅसिडोसीस किंवा पोटातील वाढलेली आम्लता

पशुपालन: अॅसिडोसीस किंवा पोटातील वाढलेली आम्लता - टंचाईच्या काळात व चारा छावण्यात अनेक वेळा ऊसाचा चारा म्हणून वापर केला जातो. उसामध्ये सहज पचणारी साखर मोठ्या प्रमाणावर असते त्यामुळे जनावराच्या पोटात जीवाणूकडून पचन होताना त्याचे वेगवेगळ्या आम्लात रुपांतर होते. यामुळे जनावरांना अॅसिडोसीस हा आजार होऊ शकतो. पचन बिघडणे, हगवण तसेच दुग्धोत्पादन कमी होणे असे लक्षणे यात दिसतात. त्याचबरोबर कमी प्रमाणातील अॅसिडोसीसचा त्रास अनेक दिवस होत राहिल्यास जनावरांच्या तब्येतीवर वाईट परिणाम होऊ शकतात, तसेच जनावरे लंगडणे, कासेचे आजारही होऊ शकतात. अॅसिडोसीस टाळण्यासाठी आठवड्यातून दोन ते तीन दिवस २५-५० ग्रॅम खाण्याचा सोडा खाऊ घालावा. तसेच पशुवैद्यकांच्या सल्ल्याने रुमेन बफर वापरावेत.
किरळ लागणे व विविध विषबाधा - कोवळी ज्वारीची धाटे तसेच अपूर्ण वाढ झालेल्या ज्वारीच्या कडब्यात असणाऱ्या हायड्रोसायनिक ॲसिडमुळे जनावरांमध्ये विषबाधा (किरळ लागणे) होते. तसेच चारा उपलब्ध नसल्याने अनेकवेळा जनावरे चरताना विषारी वनस्पती खातात, निकृष्ठ प्रतीचा बुरशी वाढलेला चारा, विविध कीटकनाशके फवारलेले पिकांचे अवशेष, फळबागांचे छाटणी केलेली पाने जनावरांना खाऊ घातली जातात. यातून विविध प्रकारच्या विषबाधा होतात. तोंडाला फेस येणे, शरीर थरथरणे, खूप घाम येणे, शरीराचे तापमान कमी होणे, बेशुद्धी किंवा फिट येणे यांसारखी विषबाधेची लक्षणे दिसताच जनावरांचा चारा बदलावा. प्रथोमोपचार म्हणून कोळश्याची भुकटी करून पाजावे व पुढील तात्काळ उपचारासाठी पशुवैद्यकांचा सल्ला घ्यावा.

शेळीपालन : भाकड शेळ्यांना पावसाळ्याअगोदर १५ दिवस १०० ते १५० ग्रॅम प्रतिदिन खुराक, भरडा दिल्यास बहुतांश शेळ्या काही दिवसांतच माजावर येतात व दोन पिले देण्याची शक्यताही वाढते. पैदाशीच्या बोकडालाही पावसाळ्याअगोदर १५ दिवस ३०० ते ३५० ग्रॅम प्रतिदिन भरडा/ खुराक दिल्यास वीर्याची प्रत सुधारते.

कुक्कुटपालन : कुक्कुटपालन जैवसुरक्षा( krushik app)
                                   कुक्कुटपालन : कुक्कुटपालन जैवसुरक्षा –पक्षिगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ निर्जंतुकीकरण औषध मिसळलेले पाय बुडविण्याचे भांडे (फूट डीप्स) ठेवावे. फार्मवर काम करणाऱ्या कामगारांना स्वच्छ व निर्जंतुक कपडे, पादत्राणे वापरूनच प्रवेश द्यावा. आपल्या फार्मवर काम करणाऱ्या कामगारांशिवाय इतर नवीन माणसांना येण्यास प्रतिबंध घालावा. वाया गेलेले खाद्य, खराब झालेली गादी, विष्ठा इ. शेडजवळ टाकू नये. यासाठी प्रक्षेत्रावर वेगळा खड्डा करून त्यामध्ये टाकावे. पक्षिगृहाच्या बाहेरील जागेत किमान ३० फूट अंतरापर्यंत निर्जंतुक द्रावणाचा फवारा मारावा. रोगनिदानासाठी आजारी कोंबड्या अथवा मृत कोंबड्या जवळच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवाव्यात. मृत कोंबड्या जाळाव्यात अथवा पुराव्यात. शक्‍यतो आपल्या फार्मवर एकाच वेळी वेगवेगळ्या वयाच्या कोंबड्या असू नयेत. यासाठी एकाच वयाच्या कोंबडीपालनाची पद्धत (ऑल इन, ऑल आऊट) जास्त सोईस्कर असते. वेगवेगळ्या वयाच्या कोंबड्या एकाचवेळी पाळल्यास एका वयाच्या कोंबड्यांकडून दुसऱ्या वयाच्या कोंबड्यांमध्ये रोगप्रसार होण्याची शक्‍यता असते.

                          कृषक अँपलिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटन क्लिक करा

Post a Comment (0)
Previous Post Next Post