पिक सल्ला- ऊस पिक खत व्यसथापन व हुमणी नियत्रण (Krushikapp)



  सुरु ऊस : सिंचनाची सोय असल्यास सुरू उसाची मोठी बांधणी करून घ्यावी. सुरू उसासाठी मोठ्या
बांधणीच्या वेळी ४० किलो नत्र (८७ किलो युरिया) , २२ किलो स्फुरद (१३७ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि २२ किलो पालाश (३७ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) प्रति एकरी द्यावे. उसाला युरियाची मात्रा देताना निमकोटेड युरियाचा वापर करावा. को-८६०३२ ही जात रासायनिक खतांच्या वाढीव मात्रेस प्रतिसाद देते. यासाठी रासायनिक खतांची एकरी २५ टक्के जादा मात्रा द्यावी.
   

खोडवा ऊस : खोडवा उसाला १३५ दिवस झाले असल्यास , वापशावर एकरी ५० किलो नत्र (१०९ किलो युरिया) , २३ किलो स्फुरद (१४५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) , २३ किलो पालाश (३९ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) या रासायनिक खतांचे मिश्रण बुडख्यांपासून सरीच्या एका बाजूला १५ ते २० सेंमी अंतरावर व १५ सेंमी खोलीवर पहारीने छिद्रे घेऊन द्यावे. दोन छिद्रातील अंतर ३० सेंमी ठेवावे. को-८६०३२ ही जात रासायनिक खतांच्या वाढीव मात्रेस प्रतिसाद देते. यासाठी रासायनिक खतांची एकरी २५ टक्के जादा मात्रा द्यावी. पहारीच्या साह्याने खते दिल्याने , खत मुळांच्या सान्निध्यात दिले जाते , त्यामुळे ते पिकास त्वरित उपलब्ध होते. दिलेल्या रासायनिक खतांचा वातावरणाशी प्रत्यक्ष संबंध कमी येत असल्याने हवेद्वारा फार कमी प्रमाणात खतांचा ऱ्हास होतो. खत जमिनीत गाडल्यामुळे वाहून जात नाही. तणांचा प्रादुर्भाव फारच कमी दिसून येतो. रासायनिक खतांची पिकांच्या गरजेनुसार हळूहळू उपलब्धता होऊन पिकाची जोमदार वाढ होते. सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात खत वापरणे शक्‍य होते , त्यामुळे सर्वत्र एकसारख्या प्रकारचे पीक येते. ऊस उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते. या पद्धतीत आपण एकावेळी एकाच बाजूने खते वापरत असल्याने , तसेच खते खोडापासून दूर असल्याने विरुद्ध बाजूस उपयुक्त जीवाणू नेहमीप्रमाणे वाढत राहतात.रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते. पीकवाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेत नत्र , स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांचा पुरवठा झाल्यामुळे ऊस उत्पादनात वाढ होते.
     
    पूर्वहंगामी ऊस : वळिवाच्या पहिल्या पावसानंतर हुमणीचे बाहेर पडणारे भुंगेरे बाभूळ किंवा कडूनिबांच्या झाडावर गोळा होतात. ते फांद्या हलवून खाली पाडावेत किंवा प्रकाश सापळे तयार करून ते गोळा करावेत. गोळा केलेले भुंगेरे रॉकेलमिश्रित पाण्यामध्ये टाकून मारावेत. असे सलग ३ ते ४ वर्षे सामुदायिकरीत्या केल्यास फायदा होतो.

ऊस संदर्भात अधिक माहिती करिता खालील विडिओ नक्की बघा


 
                  कृषक अँपलिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटन क्लिक करा


Post a Comment (0)
Previous Post Next Post