पशू सल्ला - पशुपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन. (Krushik-app)

पशुपालन : टंचाई काळात पाणी उपलब्धता नसल्याने जनावरे ओढे, नाले, तलावातील साठलेले व
पशू सल्ला - पशुपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन. (Krushik-app)
खराब पाणी पितात. अनेकवेळा गढूळ अस्वच्छ पाण्याचा पुरवठा गोठ्यांना होत असतो. अस्वच्छ साठलेले पाणी असल्यास त्यातून जनावरांना विविध रोगाची लागण होऊ शकते. पाणी साठविण्याचे हौद अनेक दिवस स्वच्छ केले जात नाहीत त्यात शेवाळ वाढून त्यातून विविध रोगजंतू पसरविले जाऊ शकतात. स्वच्छ व पिण्यायोग्य पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याचा हौद किंवा टाकी पंधरा दिवसांतून एकदा संपूर्ण कोरडी करून त्याला आतून चुना लावावा. त्यामुळे त्यात शेवाळ वाढणार नाही तसेच पाणी थंड राहून त्यातून कॅल्शिअमचाही थोडा पुरवठा होईल. गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी पाण्यात तुरटी फिरवणे सारखा सोपा उपाय करू शकतो. बाजारात पाणी स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर टॅबलेट ही उपलब्ध आहेत.

शेळीपालन : चाऱ्यावर युरिया प्रक्रिया : चाऱ्याच्या वजनाच्या २% युरियाची प्रक्रिया करावी. प्रक्रियेमुळे
पशू सल्ला - पशुपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन. (Krushik-app)
चाऱ्याची पाचकता ४५ टक्क्यांपर्यंत वाढते, खाण्याचे प्रमाण वाढते व प्रथिनांचे प्रमाण ६-१३ टक्क्यांपर्यंत वाढते. मात्र असा चारा रोजच्या रोज तयार करून वापरला पाहिजे किंवा त्याचे मुरघासात रूपांतर करून वापरावा किंवा पूर्ण वाळवून वापरावा. युरियाबरोबर चाऱ्याच्या १% मीठ, २% खनिज मिश्रण व १-२% हलका गूळ किंवा ७-१०% ऊस मळी, गव्हाचा भुसा व पेंड वापरणे फायद्याचे ठरते. हिरवा चारा नसताना जीवनसत्त्व अ व ड १-१० ग्रॅम/१०० किलो चाऱ्यात मिसळून वापरावे. युरियाचा वापर करताना कडबा, सरमाड, बगॅस, भाताचा बारीक केलेला पेंढा यांच्या कोरड्या वजनाच्या ४०% पाणी लागते. २४ तासांत युरिया मुरणे आवश्यक आहे. युरियायुक्त चारा लगेच वापरावा किंवा १५ दिवस हवाबंद करून वापरावा.

शेळ्यांना युरिया प्रक्रियायुक्त चारा एकाच वेळी न देता हळूहळू द्यावा. ८-१० दिवसांत बदल करावा. कारण ओटीपोटातील अन्न पचविणाऱ्या जिवाणूंना युरियासारख्या नत्राशी एकरूप होण्यास २ ते ७ आठवडे लागतात. युरियाचे प्रमाण ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त वाढवू नये. युरिया शक्यतो फीड ग्रेडचा वापरावा. वयाची ३-४ महिने होईपर्यंत करडांना युरियायुक्त चारा देऊ नये. करडांनी रवंथ करायला सुरवात केल्यावरच त्याचा उपयोग होतो. भरपूर हिरवा चारा उपलब्ध असताना युरियायुक्त चारा वापरू नये. शेळ्यांना हवे तेवढे स्वच्छ पाणी उपलब्ध करावे.

कुक्कुटपालन : खाद्यामध्ये जीवनसत्वे आणि खनिजांचा उपयोग वाढवावा.
जीवनसत्त्वे : जीवनसत्वांमध्ये अ, क आणि ईचा उपयोग प्रामुख्याने वाढवावा.
पशू सल्ला - पशुपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन. (Krushik-app)
अ जीवनसत्त्व पक्ष्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवते. त्यामुळे अंडी उत्पादन आणि वजन वाढते, तसेच ताण ही कमी होतो. अ जीवनसत्व १५००० आय यू या प्रमाणात खाद्यामधून द्यावे.
क जीवनस्वत्त्व हे शरीरात अमिनो आम्ल, खनिजे, संप्रेरकांच्या निर्मितीसाठी आणि चयापचयासाठी मदत करते. अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते. शरीरावर येणारा ताण कमी करण्यास मदत करते. क जीवनसत्व प्रतिकिलो खाद्यामध्ये २५० ते ४०० मिलिग्रॅम या प्रमाणात द्यावे.
ई जीवनसत्त्व ताणामुळे शरीरावर होणारे नकारात्मक परिणाम कमी करण्यास मदत करते आणि त्यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होते. ई जीवनसत्व प्रतिकिलो खाद्यामध्ये २५० मिलिग्रॅम या प्रमाणात द्यावे.
खनिजे : जास्त ताणामुळे पक्ष्यांना रेस्पायरेटरी अल्कलोसिस आजार होतो. यासाठी प्रतिकिलो खाद्यात १० ग्रॅम अमोनिअम क्लोराइड, १.५ ते ६ ग्रॅम पोटॅशियम क्लोराइड आणि २ ग्रॅम सोडिअम बायकोर्बोनेटचा वापर करावा.
खाद्यामध्ये क्रोमिअमचा वापर केल्यास ते ताण कमी करण्यास मदत करते आणि उत्पादनवाढही होते.



   
                   कृषक अँपलिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटन क्लिक करा 
     


             


Post a Comment (0)
Previous Post Next Post