पिक सल्ला :- भाजीपला पिके

 पिक सल्ला :- भाजीपला पिके - कांदा:
 कांदा: दोन पाखी चाळ : रचना पूर्व-पश्‍चिम असावी. चाळीची लांबी ३० ते ५० फूट असावी. साठवणगृह दोन पाखी असावे. प्रत्येक पाखीची रुंदी ४ फूट व दोन पाख्यांमध्ये वावरण्यासाठी ४ फूट मोकळी जागा असावी. तळ अधांतरी जमिनीपासून १ फूट उंच असावा. तळ व बाजू लाकडी पट्ट्याने किंवा बांबूने बनवलेल्या असाव्यात. दोन पट्ट्यांमध्ये १-१.५ इंच फट असावी. छप्पर ॲस्बेस्टॉसचे असावे. छपराचे पत्रे बाजूच्या भिंतीपुढे २-२.५ फूट पुढे आलेले असावेत. चाळीची मध्यावरील उंची अधांतरी तळापासून ८ फूट, बाजूची उंची ६ फूट असावी. प्रत्येक पाखीमध्ये १० फुटांचे कप्पे असावेत. प्रत्येक कप्प्यात कांदा भरण्यासाठी व बाहेर काढण्यासाठी झडपा असाव्यात. पाखीमध्ये कांदा भरल्यानंतर वर किमान २ फूट मोकळी जागा राहील हे पहावे. साठणवगृहाच्या दरवाजाकडीलत्यामागच्या बाजूवरील त्रिकोणी भागातून पाऊस आत जाऊ नये यासाठी पत्र्याचा भाग पुढे वाढवून घ्यावा किंवा ६०% सच्छिद्र जाळी लावावी.

एक पाखी चाळ : लहान शेतकऱ्यांना एक पाखी चाळ उपयुक्त आहे. उभारणी दक्षिण-उत्तर करावी. चाळीची आतील रुंदी ४ फूट असावी. लांबी २० ते ३० फूट असावी. तळ अधांतरी जमिनीपासून १ फूट उंच असावा. चाळीची मध्यावरील उंची ६.५ फूट, बाजूची उंची ५ फूट असावी. छप्पर कौलारू/ॲस्बेस्टॉस पत्रे/उसाच्या पाचटाने शाकारलेले असावे. बाजू व तळाशी लाकडी पट्ट्या किंवा बांबूचा वापर करावा. छप्पराची दुरुस्ती किंवा बदली दर ३ वर्षांनी करावी.

टोमॅटो : टोमॅटो पिकामध्ये रब्बी व उन्हाळी हंगामात भुरी रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसून येतो.
पिक सल्ला :- भाजीपला पिके
भुरीच्या नियंत्रणासाठी डिनोकॅप (४८ ईसी) ०.५ मिलि किंवा हेक्‍साकोनॅझोल (५ इसी) १ मिलि किंवा अॅझोक्सीस्ट्रोबीन (२३ एससी) १ मिलि प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. आंतरप्रवाही बुरशीनाशकाची फवारणी करताना पोटॅशियम बायकार्बोनेट ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारल्यास अधिक चांगल्या प्रकारे भुरीचे नियंत्रण करता येते. शेतामध्ये नत्र खताच्या अतिवापराने भूरीची तीव्रता वाढते. यासाठी संतुलित नत्र खतमात्रेचा वापर करावा. पालाश अन्नद्रव्यामुळे पिकाची आंतरिक रोगप्रतिकारशक्ती वाढून रोगाची तीव्रता कमी होते, यासाठी पालाशयुक्त विद्राव्य खतांचा फर्टीगेशन/ फवारणीद्वारे वापर करावा. दाटीवाटीने वाढलेल्या पिकामध्ये रोगप्रसारासाठी अनुकूल सूक्ष्म हवामान बनते व रोगाची तीव्रता वाढते. म्हणून पिकाच्या ओळींमध्ये हवा खेळती राहील, अशाप्रकारे रोपांची संख्या योग्य ठेवणे आवश्यक आहे.

कोबीवर्गीय : कोबीवर्गीय पिकांची मुळे उथळ असतात. आवश्यकतेनुसार जमिनीच्या मगदुराप्रमाणे
पिक सल्ला :- भाजीपला पिके
पाण्याच्या पाळ्या वरचेवर नियमितपणे द्याव्यात. गड्डे तयार झाल्यावर पाणी बेताचे द्यावे; अन्यथा गड्डे फुटण्याची शक्‍यता असते. तसेच कोबीवर्गीय पिकांना गड्डा तयार होण्याच्या वेळी पाण्याचा ताण पडू देऊ नये, अन्यथा गड्डे लहान राहतात.

वेलवर्गीय : फळांची गुणवत्ता व वेलींची वातावरणाचा ताण सहन करण्याची क्षमता वाढविण्यासाठी पोटॅशियम
पिक सल्ला :- भाजीपला पिके

नायट्रेट (१३-००-४५) हे विद्राव्य ५ ग्रॅम व सागरी वनस्पती अर्क २ मिलि प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. पांढऱ्या मुळींची जोमदार वाढ व जमिनीमधील मुख्य अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविण्यासाठी व्हॅम (व्हेसीक्युलर अर्ब्यूस्क्युलर मायकोरायझा), ॲझोटोबॅक्‍टर, पी.एस.बी. (स्फुरद विरघळविणारे जीवाणू), के.एम.बी. (पालाश उपलब्ध करणारे जीवाणू) प्रति एकरी प्रत्येकी २ किलो या चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून जमिनीमध्ये वापर करावा. यासोबतच ठिबक सिंचनाद्वारे नियमित पाणी व्यवस्थापन व फर्टीगेशनद्वारे पिकवाढीच्या अवस्थ्येनुसार विद्राव्य खतांचा पुरवठा केल्यामुळे पीक सशक्त राहील आणि त्याच्या प्रतिकार क्षमतेत वाढ होईल.
कृषक अँपलिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटन क्लिक करा
                                                    









Post a Comment (0)
Previous Post Next Post