टोमॅटो
टोमॅटो
पिकावर लवकर येणारा करपा (अर्ली ब्लाइट) हा रोग
अल्टरनेरीया सोलॅनी नावाच्या
बुरशीमुळे होतो.
सुरवातीला जमिनीलगतच्या पानांवर लहान गोलाकार ते आकारहीन, तपकिरी ते काळपट रंगाचे वलयांकित ठिपके
दिसून येतात. प्रादुर्भाव वाढून ठिपके एकमेकात मिसळून मोठ्या आकाराचे तपकिरी चट्टे
पानावर तयार होतात. यामुळे पाने करपून गळतात. पानाप्रमाणे फळावर (देठाच्या बाजूने), खोडावरदेखील गर्द तपकिरी वलयांकित डाग
पडतात. त्यामुळे फांद्या कमकुवत होऊन मोडतात. तर टोमॅटोवर येणारा सेप्टोरीया पर्ण
करपा (सेप्टोरीया लीफ ब्लाइट) हा रोग सेप्टोरीया लायकोपर्सिकी नावाच्या बुरशीमुळे
होतो. रोगाच्या प्राथमिक अवस्थेत झाडाच्या खालील पानांवर लहान, गोलाकार ठिपके दिसून येतात. मध्यभागी
करड्या रंगाचे व कडा गडद तपकिरी असणारे अनेक ठिपके पानांवर दिसून येतात.
प्रादुर्भावग्रस्त पाने पिवळी पडून वाळून जातात व गळून पडतात. टोमॅटोवरील या
रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मशागत करून शेत स्वच्छ व तणविरहित ठेवावे.
झाडावरील तसेच जमिनीवर पडलेले रोगग्रस्त फळे, पाने
गोळा करून जमिनीत गाडावित अथवा जाळून नष्ट करावीत. रोगाची लक्षणे दिसताच, नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (५०
डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम किंवा अॅझोक्सीस्ट्रोबीन (२३ एससी) १ मिलि किंवा
पायरॅक्लोस्ट्रोबीन (२० डब्ल्यूजी) १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी
करावी. आवश्यकतेनुसार पुढील फवारणी ८ ते १० दिवसांच्या अंतराने करावी.
कांदा
खरीप
कांदा ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यात बाजारपेठेत आणता आला तर चांगला दर मिळतो.
त्यासाठी
बियाणे पेरणी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा मे महिन्यात करून
रोपांची लागवड जून-जुलैच्या पहिल्या आठवड्यात करावी. जूनच्या पहिल्या आठवड्यात
लागवड झाली तर सप्टेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात कांदा काढणीला येतो.
या काळात पाऊस नसेल तर काढणी व तात्पुरती सुकवणी चांगली होऊ शकते. राष्ट्रीय कांदा
व लसूण संशोधन संचालनालय,
राजगुरुनगरद्वारे विकसित केलेल्या भीमा
सुपर, भीमा राज, भीमा रेड, तसेच पांढऱ्या जातीमध्ये भीमा शुभ्रा, भीमा श्वेता; तसेच कृषी विद्यापीठ, फलोद्यान संशोधन संस्थांनी विकसित
केलेल्या बसवंत ७८०, फुले समर्थ किंवा ॲग्रिफाउंड
डार्क रेड, अर्का कल्याण जातींची निवड करावी.
घाण्या
रोग - प्रथम पानाच्या कडेला पिवळेपणा येतो. नंतर तो कडेपासून पानाच्या आतील
भागाकडे वाढ जाऊन शेवटी इंग्रजी ‘व्ही’ किंवा त्रिकोणासारखा पट्टा पडतो. हा
डाग किंवा चट्टा पानाच्या मुख्य शिरेपर्यंत पसरत
जाऊन प्रादुर्भावित भाग तपकिरी
पडतो. रोगट भागातील पानाच्या शिरा काळ्या पडतात. रोगग्रस्त भाग मोडल्यास त्यातून
दुर्गंधीयुक्त काळसर द्रव निघतो. म्हणून त्याला घाण्या रोग म्हणतात. रोग गड्डा आणि
मुळापर्यंत पसरल्यास कोबी,
फ्लॉवरचे गड्डे पूर्णपणे सडून जातात.
रोगाचा प्रादुर्भाव लागवडीनंतर त्वरित झाल्यास रोगग्रस्त झाड मरते. रोगाची लक्षणे
दिसताच झाडाच्या खालील पाने काढून नष्ट करावीत. कॉपर ऑक्झीक्लोराइड ३ ग्रॅम अधिक
स्ट्रेप्टोमायसीन ०.१ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून दहा दिवसांच्या अंतराने २
ते ३ वेळा फवारणी करावी. करपा (ब्लॅक लिफ स्पॉट) - प्रादुर्भावग्रस्त गड्डा, देठ आणि खोडावर गोलाकार किंवा लंबगोल
काळसर रंगाचे डाग दिसतात. पानावर एकात एक वलये असलेले तपकिरी काळे ठिपके पडतात.
ढगाळ हवामानात रोगाची तीव्रता वाढून हे डाग एकमेकांत मिसळतात. सर्व भाग काळपट पडून
पाने करपल्यासारखी दिसतात. कोबी, फ्लॉवरच्या
गड्ड्यांवर रोगाचा प्रादुर्भाव होऊन गड्डे तपकिरी रंगाचे होतात. नियंत्रणासाठी
रोगग्रस्त झाडांचा उपटून नायनाट करावा. रोगाचा प्रादुर्भाव दिसताच मॅंकोझेब किंवा
कॉपर ऑक्झीक्लोराईड किंवा क्लोरोथॅलोनील २.५ ग्रॅम अधिक स्टिकर १ मिलि प्रति
लिटर पाण्यातून फवारावे
वेल वर्गीय पिके
: कोरड्या आणि उष्ण हवामानात लाल कोळी
किडीचा प्रादुर्भाव वाढतो. ही सूक्ष्म कीड पानांच्या मागील बाजूस
राहून, पानांतील रस शोषते. परिणामी पानांवर
पिवळे, तांबडे, लाल चट्टे पडतात. पाने वाकडी होऊन वाळतात. कालांतराने पाने गळून
पडतात. प्रादुर्भावाच्या प्राथमिक अवस्थेत कीडग्रस्त पाने तोडून नष्ट करावीत. लाल
कोळी किडीच्या नियंत्रणासाठी अझाडीरॅक्टीन (१०,०००
पीपीएम) २ मिलि किंवा फेनाझाक्विन (१० ईसी) २.५ मिलि किंवा फेनपायरॉक्झीमेट (५
ईसी) १ मिलि अधिक स्टीकर १ मिलि प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी
कृषक अँपलिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटन क्लिक करा