आले
आले या पिकासाठी एकूण १६ अन्नद्रव्यांची कमी-अधिक
प्रमाणात आवश्यकता असते. माती परीक्षणानुसार संतुलित आणि योग्यवेळी प्रमाणशीर खते
वापरावीत. एकरी ४८ किलो नत्र, ३० किलो स्फुरद आणि ३० किलो पालाश खतमात्रांची आवश्यकता असते.
यापैकी संपूर्ण
स्फुरद (३० किलो स्फुरद - १८७ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि पालाशची मात्रा (३०
किलो पालाश - ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश) जमीन तयार करतेवेळी द्यावी. नत्र खताचा
निम्मा हप्ता (२४ किलो नत्र – ५२ किलो युरिया) आले पिकाची उगवण पूर्ण झाल्यानंतर साधारणतः एक महिन्यांनी
द्यावा. राहिलेला अर्धा नत्र (२४ किलो नत्र – ५२ किलो युरिया) उटाळणीच्या वेळी २.५ ते ३ महिन्यांनी द्यावा. त्या वेळी एकरी
६०० ते ८०० किलो करंज पेंड किंवा निंबोळी पेंड द्यावी.
हळद
हळद
या पिकासाठी एकूण १६ अन्नद्रव्यांची कमी-अधिक प्रमाणात आवश्यकता असते. माती
परीक्षणानुसार संतुलित आणि योग्यवेळी प्रमाणशीर खते वापरावीत. एकरी ८०
किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश
खतमात्रांची आवश्यकता आहे. यापैकी संपूर्ण स्फुरद (५० किलो स्फुरद – ३१२ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि
संपूर्ण पालाशची मात्रा (५० किलो पालाश - ८३ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) जमीन तयार
करतेवेळी द्यावी. नत्र खताचा निम्मा हप्ता (४० किलो नत्र - ८७ किलो युरिया) हळद
पिकाची उगवण पूर्ण झाल्यानंतर साधारणतः एक महिन्यांनी द्यावा. राहिलेला अर्धा नत्र
(४० किलो नत्र - ८७ किलो युरिया) उटाळणीच्या वेळी २.५ ते ३ महिन्यांनी द्यावा.
त्या वेळी एकरी ६०० ते ८०० किलो करंज पेंड किंवा निंबोळी पेंड द्यावी.