पशू सल्ला


पशुपालन : वाढत्या तापमानाचा गोठ्यातील सूक्ष्म वातावरणावर विपरीत परिणाम होऊन जनावरांमध्ये ताण येतो. त्यामुळे जनावराची उत्पादन क्षमता, प्रजनन क्षमता आणि उत्पादनाची गुणवत्ताही कमी होते आणि मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. मध्यम ते तीव्र तणावाच्या
पशुपालन
परिस्थितीमध्ये जनावरांना स्वच्छ, थंड पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध करावे, जेणेकरून शरीराचे तपमान सामान्य मर्यादेत ठेवण्यास मदत होईल. शरीरातील क्षारांचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी मिठाचे चाटण द्यावे. सावली पुरवता येते, परंतु उष्ण वारे रोखता येत नाही. त्यासाठी गोठ्याच्या छपरावर पाण्याचा फवारा मारावा. गोठ्यात हवेच्या नियमनासाठी खिडक्यांची व्यवस्था असावी. दोन्ही शिंगाच्यामध्ये ओले कापड ठेवावे व त्यावर वारंवार थंड पाणी टाकावे. भिंती तट्ट्याच्या असतील, तर त्यावरसुद्धा पाणी शिंपडावे. जनावरांच्या शरीरावर पाणी शिंपडावे. स्थानिक पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.

शेळीपालन
शेळीपालन : शेळ्यांच्या कोठीपोटीचा आकार लहान असल्याने त्यांना दिवसातून ३-४ वेळा खाद्य द्यावे. शेळ्यांना प्रथिनयुक्त द्विदल जातींचे हिरवे ओले किंवा सुके गवत उदा. ल्यूसर्न, बरसीम, चवळी इत्यादी आवडते. शेळ्यांना त्यांच्या आंबोणात (खुराकात) मीठ असलेले खनिज मिश्रण २ टक्के या प्रमाणात वापरावे. प्रथिनयुक्त द्विदल गवत उपलब्ध नसल्यास आयोडीनयुक्त मीठ व डाय कॅल्शीयम फॉस्फेट समभाव घेऊन यांचे मिश्रण द्यावे. शेळीच्या जीवनात पोषणाच्यादृष्टीने काही महत्त्वाच्या अवस्था (काळ) असतात. त्या काळात शेळ्यांची अन्नघटकांची गरज वाढते अश्या वेळी योग्य आहार द्यावा . प्रथिने पुरवण्याकरिता वेगवेगळ्या तेलबियांच्या पेंडीचा (उदा. शेंगदाणा, तीळ, सरकी, सोयाबीन, सूर्यफूल, खोबरे, करडई) समावेश करावा. याशिवाय डाळ तयार झाल्यावर उपलब्ध होणारी चुणी (तूर, चणा, उडीद चुणी इ. ) सुद्धा प्रथिनांच्या दृष्टीने उपयुक्त आहे.

कुक्कुटपालन : खाद्याचे पचन करताना निर्माण होणारी उष्णता पक्ष्यांमध्ये ताण निर्माण करते. उन्हाळ्यात पक्ष्याला सरासरी इतर ऋतूंपेक्षा तापमानानुसार कमी ऊर्जेची आवश्‍यकता असते.
कुक्कुटपालन
खाद्यामध्ये ऊर्जेचे प्रमाण कमी असावे. प्रथिनांमुळे खाद्य पचन होताना अधिक ऊर्जा (उष्णता) निर्माण होते. त्यामुळे खाद्यामध्ये प्रथिने योग्य प्रमाणात असावीत. क्रूड प्रथिनांचे प्रमाण कमी करून त्यामध्ये कृत्रिम, स्वस्त अशा अमिनो आम्लांचा वापर वाढवावा. जेणेकरून खाद्य पचनाच्या वेळी कमी उष्णता निर्माण होईल. खाद्यामध्ये स्निग्ध पदार्थांचा (तेल / फॅट) वापर वाढवावा. कार्बोदके आणि प्रथिनांपासून मिळणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी १० ते १५ टक्के ऊर्जा स्निग्ध पदार्थांद्वारे द्यावी. कारण, स्निग्ध पदार्थांच्या पचनातून निर्माण होणारी ऊर्जा ही इतर पदार्थांच्या पचनातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेपेक्षा कमी असते.

कृषक अँपलिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटन क्लिक करा
  

 कृषक अँपलिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटन क्लिक करा
Post a Comment (0)
Previous Post Next Post