पुणे : शेतमाल बाजारभाव वृत्तांकन

 पुणे : शेतमाल बाजारभाव वृत्तांकन

सौजन्य : पुढारी

दिनांक : 09-Feb-26

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमुळे शेतमालाची तोड कमी प्रमाणात झाल्याने रविवारी गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात फळभाज्यांची आवक वीस ट्रकने घटली. मागील आठवड्यात झालेली ११० ट्रक आवक रविवारी ९० ट्रकवर आली. बाजारात दाखल झालेल्या मालाच्या तुलनेत मागणी अधिक राहिल्याने टोमॅटो आणि काकडीच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले.

 तामिळनाडूपाठोपाठ कर्नाटक येथून तोतापुरी कैरीची आवक सुरू झाली असून, आवक दुपटीने वाढल्याने त्याच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली. मागणी आणि पुरवठा, यातील समतोलामुळे उर्वरित फळभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी दिली. परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे १४ ते १५ टेम्पो, कर्नाटक येथून कोबी ४ ते ५ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा ३ ते ४ टेम्पो, राजस्थान येथून गाजर सुमारे ७ ते ८ टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा २ ते ३ टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून भुईमूग शेंग २ ते ३ टेम्पो, मध्य प्रदेश, राजस्थान आणि पंजाब येथून मटार १५ ते १६ टेम्पो, कर्नाटक येथून पावटा २ टेम्पो, तामिळनाडू आणि कर्नाटक येथून तोतापुरी कैरी ३ ते ४ टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे १० ते १२ टेम्पो, तर इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागातून मिळून बटाटा ३० ते ३५ टेम्पो आवक झाली होती.

 स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले ४०० ते ४५० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार २ ते ३ टेम्पो, टोमॅटो ६ ते ७ हजार क्रेट, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, तांबडा भोपळा २ टेम्पो, गाजर २ ते ३ टेम्पो, घेवडा २ ते ३ टेम्पो, पावटा २ टेम्पो आणि कांद्याची ७० ते ८० टेम्पो इतकी आवक झाली होती.

 ✦फळभाज्यांचे घाऊक भाव (प्रति १० किलो) : कांदा : ८०-१३० रु., बटाटा : ९०-१४०, लसूण : ५००-१३००, आले : ३५०-६००, भेंडी : ३००-५००, गवार : ८००-११००, टोमॅटो : १५०-२००, दोडका : ४००-५००, हिरवी मिरची : ६००-७००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २५०-३००, काकडी : २००-२५०, कारली : ३००-५००, पापडी : २००-२५०, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : १५०-२००, कोबी : ८०-१२०, वांगी : २५०-५००, डिंगरी : ४००-५००, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : ४००-५००, तोंडली : २००-५००, शेवगा : ८००-१०००, गाजर : १६०-२५०, वालवर : १८०-२२०, बीट : १००-१२०, घेवडा : २००-२५०, कोहळा : १००-१५०, आर्वी : २५०-३००, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २५०-३००, पावटा : ४००-५००, भुईमूग शेंग : ७००-१०००, मटार : २००-२८०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००

 🔹मेथी, कोथिंबीर, कांदापात, शेपू आणि चवळई महागली

 मार्केट यार्डात पालेभाज्यांची आवक घटली आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे मेथी, कोथिंबीर, कांदापात, शेपू आणि चवळईच्या भावात वाढ झाली आहे. सर्वाधिक मेथीच्या जुडीच्या भावात घाऊक बाजारात जुडीमागे ७ रुपयांनी वाढ झाली आहे. त्याखालोखाल कोथिंबिरीच्या भावात ५ रुपये, कांदापात ३ रुपये, शेपू २ रुपये, तर चवळईच्या भावात १ रुपयाने वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा, यातील समतोलामुळे उर्वरित पालेभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यपाऱ्यांनी दि���ी. येथील बाजारात मागील रविवारी (दि. १) कोथिंबिरीची दीड लाख जुडी आवक झाली होती. त्यामध्ये घट होऊन आज ९० हजार जुडी आवक नोंदविण्यात आली. तर, मागील आठवड्यात ८० हजार जुडी आवक झालेल्या मेथीची आज ६० हजार जुडी, मागील आठवड्यात १२ हजार जुडी आवक झालेल्या हरभरा गड्डीची आज ७ ते ८ हजार जुडी आवक झाली. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमुळे काढणी कमी झाल्यामुळे आवक घटल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

 ✦पालेभाज्यांचे घाऊक भाव (शेकडा जुडी) : कोथिबीर : १०००-२००० रु., मेथी : १०००-१५००, शेपू : ८००-१०००, कांदापात : ८००-१५००, चाकवत : ४००-७००, करडई : ३००-७००, पुदिना : ३००-५००, अंबाडी : ५००-७००, मुळा : ८००-१५००, राजगिरा : ४००-७००, चुका : ५००-८००, चवळी : ४००-७००, पालक : ८००-१५००

 🔹लग्नसराईमुळे शोभीवंत फुलांची चलती

 पुणे : लग्नसराई सुरू झाल्याने लग्नमंडपासह विविध कार्यक्रमांच्या ठिकाणी होणाऱ्या सजावटीसाठी डच गुलाब, कार्नेशियन, जर्बेरा, लिलियम, ऑर्चिड तसेच केशरचनेसाठी जिप्सोफिला आदी फुलांना मागणी होत आहे. बाजारात शोभिवंत फुलेही मोठ्या प्रमाणात दाखल होत असून, मागणी जास्त असल्याने त्यांच्या भावात गत आठवड्याच्या तुलनेत दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे.

 महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी फुले राखण्यास प्राधान्य दिल्याने सुट्या फुलांची आवक घटली आहे. परिणामी, या फुलांच्या भावातही दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती अडतदार सागर भोसले यांनी दिली.

 ✦फुलांचे प्रतिकिलोचे दर : पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-५०, गुलछडी : १००-१५०, अॅष्टर : जुडी १६-२५, सुट्टा १००-१५०, कापरी : ४०-६०, शेवंती : ६०-१२०, गुलाबगड्डी (गड्टीचे भाव) : ५०-७०, गुलछडी काडी : ५०-१२०, डच गुलाब (२० नग) : ३००-६००, जर्बेरा : ४०-५०, कार्नेशियन : १५०-२५०, शेवंती काडी २००-३५०, लिलियम (१० काड्या) १५००-१८००, ऑर्चिड ५००-६००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ८०-१२०, जिप्सोफिला : ३००-५००, लीली बंडल : १०-१२

 🔹उन्हाची तीव्रता वाढताच पुण्यात लिंबांसह फळे महागली

 उन्हाचा चटका जाणवू लागल्याने शहरातील सरबत विक्रेते, रसवंतिगृहे तसेच घरगुती स्वरूपात लिंबांना मागणी वाढू लागली आहे. त्यातुलनेत बाजारातील आवक रोडावल्याने लिंबाच्या १५ किलोंच्या गोणीमागे २०० ते २५० रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात चार रुपयांना एक, तर दहा रुपयांना तीन, याप्रकारे विक्री होत आहे.

 बाजारात कलिंगड, खरबूज आणि पपई आदी रसदार फळांनाही मोठी मागणी आहे. त्यातुलनेत आवक कमी असल्याने कलिंगड आणि पपई किलोमागे दोन रुपये, तर खरबूज पाच रुपयांनी महागल्याचे व्यापारीवर्गाकडून सांगण्यात आले. उर्वरित सर्व फळांची आवक-जावक कायम असल्याने गत आठवड्यातील दर टिकून होते. फळबाजारात रविवारी (दि. ८) मोसंबीची ४० ते ४५ टन, संत्रा ३० ते ४० टन, डाळिंब २० ते २२ टन, पपई ८ ते १० टेम्पो, लिंबाची सुमारे एक ते दीड हजार गोणी, कलिंगड १५ ते २० टेम्पो, खरबूज २० ते २५ टेम्पो, चिकू २ हजार गोणी, पेरू १५० ते २०० क्रेट, स्ट्रॉबेरी ६ ते ७ टन, द्राक्षे ८ ते १० टन, अननस ६ ट्रक आणि बोरांची १०० पोती इतकी आवक झाली.

 ✦फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ३००-७००, मोसंबी : (३ डझन) : १२०-६००, (४ डझन) : ५०-३००, संत्रा : (१० किलो) : २५०-९००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ८०-३००, आरक्ता : १०-८०, गणेश : १०-४०, कलिंगड : १८-२५, खरबूज : १२-३०, पपई

: १२-२५, चिक्कू (दहा किलो) : १००-६००, पेरु (२० किलो) : ६००-७००, अननस (१ डझन): १००-६००, बोरे (१० किलो) : चमेली ४००-४५०, चेकनट १०००-१२००, उमराण १५०-२००, द्राक्षे (१० किलो) : जम्बो १०००-१५००, सुपर सोनाका १०००-१२००, सोनाका ७००-९००, स्ट्रॉबेरी (२ किलो) १००-३५०

अधिक माहितीसाठी आत्ताच डाउनलोड करा कृषीक ॲप 

Post a Comment (0)
Previous Post Next Post