पावसाळ्यातील अतिरिक्त चाऱ्यापासून दर्जेदार सुका चारा कसा तयार करावा?

पावसाळ्यातील अतिरिक्त चाऱ्यापासून दर्जेदार सुका चारा कसा तयार करावा?

🌾सुक्या चाऱ्याची शास्त्रीय निर्मिती व साठवणू 🌾

• शेतीतील पिकांचे वाळलेले अवशेष म्हणजे सुका चारा; मात्र ५०% फुलोऱ्यात कापणी करून सावलीत वाळवलेला चारा अधिक पोषक असतो. • अशा पद्धतीने तयार केलेल्या सुक्या चाऱ्यात हिरवा रंग व पौष्टिक घटक दीर्घकाळ टिकून राहतात. • पावसाळ्यात उपलब्ध असलेला अतिरिक्त चारा, जो मुरघासासाठी योग्य नाही (द्विदल चारा पिके, पिकांचे अवशेष), सुक्या चाऱ्यासाठी उपयुक्त ठरतो. • कापलेला चारा २ ते ३ दिवस शेतात पातळ थर देऊन सुकवावा. • सुकवताना चाऱ्याला दोन-तीन वेळा उलट-पालट करणे आवश्यक आहे. • पाण्याचे प्रमाण कमी झाल्यानंतर चारा सावलीत जमिनीवर किंवा रॅकवर पसरून वाळवावा. • योग्य पद्धतीने वाळविल्यास हिरव्या रंगाचा, दर्जेदार सुका चारा तयार होतो. • तयार चाऱ्याच्या गासड्या किंवा पेंढ्या बांधून सुरक्षित साठवणूक करता येते. • या पद्धतीमुळे चाऱ्याची पाने गळत नाहीत व पोषक घटकांचा ऱ्हास टळतो. • लसूण घास, बरसीम यांसारख्या द्विदल चाऱ्याचा सुका चारा पचनीय तंतुमय पदार्थांसह प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत ठरतो.

➖➖➖

• राज्यातील प्रमुख बाजारपेठांचे ताजे बाजारभाव • मोफत गावनिहाय हवामान अंदाज • हळद पिक सल्ला व समस्या मार्गदर्शन• शासकीय कृषी योजना माहिती• ताज्या कृषी बातम्या • खतसाठा व उपलब्धता माहिती 👉 “कृषिक अॅप” आजच Play Store वरून डाउनलोड करा 📱


Post a Comment (0)
Previous Post Next Post