कृषिक २०२६ : येत्या १७ ते २४ जानेवारी दरम्यान देशाच्या शेतीला दिशा देणारे बारामतीचे अकरावे कृषि प्रदर्शन


सौजन्य : कृषिक टीम

दिनांक : 08-Jan-26

अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र, बारामती मार्फत गेल्या दहा वर्षांपासून कृषिक हे भारतातील नव्हे तर जगातील सर्वात मोठे प्रात्यक्षिक आधारित कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यावर्षीचे ११ वे कृषिक प्रदर्शन दिनांक १७ ते २४ जानेवारी २०२६ दरम्यान होत आहे.

 थेट प्रात्यक्षिकावर आधारीत कृषी प्रदर्शनाचे हे ११ वे वर्ष असून दरवर्षी देशभरातून साधारण अडीच ते तीन लाख शेतकरी भेट देतात. तब्बल १७० एकर प्रक्षेत्रावर या प्रदर्शनाचे आयोजन केले जाते.

 ✨आर्टिफिशीयल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुध्दीमत्तेची संकल्पना

 Øभारतातील शेतीला दिशा देणारी उसाची शेती - देशातील पहिले फार्म ऑफ द फ्युचर

 Øउसाचे प्रती एकरी २०० टन उत्पादन

 Øऊस खोडव्याचे प्रती एकरी १५० टन उत्पाद

 Øराज्यातील ५ हजार शेतकऱ्यांची AI तंत्रज्ञानाद्वारे ऊसाची लागण

 Øआयओटी, सेन्सर, ड्रोन, रोबोटीक्स, सॅटेलाईट मॅपिंग, रिमोट सेन्सिंग इ. या तंत्रज्ञानाचा वापर

 Øखत, पाणी व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, उत्पादनाची गुणवत्ता, सुयोग्य काढणीपश्चात तंत्रज्ञान, उत्पन्नाचाअंदाज, हवामान बदलानुसार पिक पद्धतीचे नियोजन, बाजारभावाचा अंदाज, जमिनीची उत्पादकता, मातीची गुणवत्ता, रासायनिक खतांचा वापर

 Ø जमिनीतील सेन्सर, ड्रोन, रोबोट व सेटेलाईटद्वारे संपूर्ण प्रक्षेत्राचे नियोजन 

AI आधारित इतर पिकांचे प्रात्यक्षिके Ø AI तंत्रज्ञान म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून केळी पीकामध्ये ग्रँड नैन केळी आणि एआयमुळे २५ टक्के ण्याची बचत आणि ४० टक्के खतांमध्ये बचत करून एकरी ५० टन उत्पादन घेण्याचे तंत्रज्ञान

 Øसघन मका लागवड तंत्रज्ञान हे KVK बारामतीने गेल्या दहा वर्षांपासून चिनी पद्मधतीने का लागवड तंत्रज्ञान म्हणून प्रसारित केले आहे आणि सध्या राज्यातील वीस हजारपेक्षा जास्त शेतकरी या तंत्रज्ञानाप्रमाणे लागवड करत आहेत, ज्यामुळे एकरी सरासरी ५० क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले आहे आणि आता या तंत्रज्ञानाचा वापर करून अचूक पाणी व खत व्यवस्थापन करून एकरी 70 ते ८० क्विंटल प्रति एकरी मका उत्पादन घेता येणार आहे.

 Øगोदावरी तुरीचे दहा फूट पट्टा पद्धतीने लागवड करून एकरी 20 क्विंटल उत्पादन फक्त एआय तंत्रज्ञानामुळेच शक्य आहे, हे KVK बारामतीच्या प्रात्यक्षिक प्लॉटमध्ये दाखवून दिलेआहे.

 Ø एआय तंत्रज्ञान आधारित कांदा उत्पादन अगदी सहा इंच खोलीचे सेन्सरद्वारे पाणी नियोजन केलेले आहे. एआय प्रणालीद्वारे कीड व रोगमुक्त व्यवस्थापन आणि एकरी 600 पिशवी म्हणजे 30 टन उत्पादन घेणे शक्य आहे. यामध्ये भीमा शक्ती या आठ महिने टिकणाऱ्या वाणाचा समावेश आहे. तसेच, पाचशे ते सहाशे ग्राम वजनाचा लाल कांदा जो नेदरलँड येथील कंपनीने विकसित केलेला आहे.

 ✨ *नाविन्यपूर्ण फळझाडांचे अत्याधुनिक लागवड तंत्रज्ञान*

 Øबेरीचे विविध प्रकार, अवाकॅडो, प्लम, पिअर, लिची, रँबुटान, मॅंगोस्टीन, लक्ष्मण फळ, पॅशन फ्रूट, खजूर

 Øनिळी व लाल केळी, एक खोड आधारीत डाळींब, एकाच वर्षात उत्पादन होणारी बुलेट द्राक्षे, स्टारफ्रूट, झुकिनी, खरबूज, तैवान पेरू, थाई फणस, अंजीर

 Øद्राक्ष, डाळिंब, पेरूची इजराइल, जर्मनी येथील तंत्रज्ञान, ऑटोमेशन आणि फर्टिगेशन, क्रॉप कव्हर, फळ कव्हर, बॅग आणि क्रॉप मॉनिटरिंग सिस्टम असे विविध फळबागातील तंत्रज्ञान

 Øसह्याद्री फार्म नाशिकचे द्राक्षाचे आरा वाण व बुलेट, नारायणगाव सिलेक्शन, कृष्णा हे लोकल वाण, तसेच दुसऱ्या वर्षातील बागेला एकरी दहा टन उत्पादन

 Øडाळिंब पिकाचे एक खोड तंत्रज्ञान आणि त्यामध्ये द्राक्षप्रमाणे स्टेजिंगआणि क्रॉप कवर तंत्रज्ञान

 Ø पेरूची सघन लागवड आणि निर्यातक्षम उत्पादन तंत्रज्ञान, यामध्ये विड मेटचा वापर, फळावरील फोमचा वापर, छाटणी व आधार देण्याची पद्धत, KVK ची रत्नदीप व्हरायटी आणि त्याचबरोबर तैवान पिंक, गुजरात रेड, एल-४९ वाणाचे प्रात्यक्षिक

 ✨ *हायड्रोपोनिक भाजीपाला तंत्रज्ञान*

 Ø टोमॅटो, हँगिंग स्ट्रॉबेरी, लेट्युस, कोबी, ब्रोकोली आणि इतर पालेभाज्या हायड्रोपोनिकच्या विविध पद्धती

 Øसोलर पोलीहाऊस व त्यामध्ये हॅंगिंग स्ट्रॉबेरी

 Øहायड्रोपोनिक व्हील आणि त्यामध्ये भाजीपाल्यांच्या विविध प्रकारांची लागवड केलेली आहे, ज्यामध्ये आपण पूर्वी हायड्रोपोनिकचे हॉरिझोंटल, वर्टीकल आणि एनएफटी इतकेच प्रकार पाहिले आहेत. मात्र, कमी जागेत तिप्पट उत्पादन घेण्यासाठी गोलाकार व्हीलमध्ये लेटूस, स्ट्रॉबेरी किंवा इतर पालेभाज्या घेणे शक्य आहे. 

अत्याधुनिक भाजीपाला तंत्रज्ञान Øअर्क चैत्र हा वाटण्याचा वाण आहे, जो राष्ट्रीय बागवानी संशोधन केंद्र(IIHR), बेंगलोर यांनी विकसित केलेला वाणहा ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानामध्ये तग धरतो आणि याची उंची चार फूटपर्यंत वाढते, फक्त ६० दिवसात तयार होणारा हा वाण भुरीरोग प्रतिबंधकआहे.

 Ø ४० प्रकारचे वांग्याचे वाण

 Ø१५ प्रकारचे भोपळे त्यामध्ये ४०० किलोचा भोपळा

 Ø खुल्या पध्दतीने अधिक दर्जेदार व अधिक उत्पादन देणारा टोमॅटो तसेच काळा टोमॅटो व १५०पेक्षा जास्त प्रकारचे टोमॅटोचे देशी वाण

 Øभाजीपाला स्टेजिंगचा नवीन प्रकार आणि त्यावर टोमॅटो व काकडी लागवड. हे स्टेजिंग किमान दहा वर्ष पुन्हा-पुन्हा वापरता येईल. यामध्ये दर्जेदार आणि दीडपट जास्त उत्पादन घेता येणार आहे.

 Øदेशी वाणांचे टोमॅटोचे १५० पेक्षा जास्त प्रकार यामध्ये काळ्या रंगाच्या किंवा जांभळ्या रंगाच्या वैविध्यपूर्ण टोमॅटोसह विविध आकारातील टोमॅटो उत्पादित होणारे देशी वाण

 Ø कमी उंचीचे स्पेन देशातील तंत्रज्ञान आधारित भाजीपाला टनेल जे दहा गुंठे क्षेत्रावर घेतल्यास सात लाख रुपये खर्च येतो आणि त्यामध्ये भरिताचे वांगे तेही कलमी रोपे लावल्यास नऊ ते दहा महिने कालावधीकरता ते चालतात आणि एकूण १८ ते2 0 टन उत्पादन मिळते. सरासरी रुपये भाव याप्रमाणे चार लाख रुपये उत्पादन पहिल्या वर्षी येते. यात टोमॅटो, ढोबळी मिरची, खरबूज, कलिंगड आणि इतर पिके घेणे शक्य आहे. ह्यामध्ये वातावरण नियंत्रित करता येते, त्यामुळे रोग, कीड आणि खत व्यवस्थापनामध्ये बचत होते.

 Øविविध रंगातील स्वीटकोर्न

 Øब्रुसेल्स स्प्राउट हे नवीन पीक

 Øकलमी भाजीपाला आणि त्यामध्ये एकाच झाडावर वांगी आणि टोमॅटो

 ✨ *एरंडी आणि त्यापासून रेशीम शेती*

 Øएरंडी पिकाचे एकरी वीस क्विंटल उत्पादन व त्याच्या पाल्यापासून रेशीम उद्योग ज्याला इरी सील्क उद्योग म्हणतात. यामुळे एकरी दोन लाख रुपयेपर्यंत उत्पादन मिळते.

 ✨ *नैसर्गिक शेतीचे प्रात्यक्षिक*

 Ø जीवाणू खते व औषधांचा वापर, १० ड्रम तंत्रज्ञान, द��पर्णी अर्क, जीवामृत, शून्य मशागत तंत्रज्ञानावर आधारित पिके, पिक फेरपालटाचे महत्व, गांडूळखत आणि सेंद्रिय खत निर्मिती, नैसर्गिक शेतीवर आधारित कडधान्ये, भाजीपाला, फळबाग

 Øशेती क्षेत्रातील होमिओपॅथीचा वापर

 ✨ *परदेशी कट फ्लॉवरची प्रात्यक्षिके*

 Ø परदेशी फुलपिके, जर्मनी येथील शेवंतीचे २६ वाण तेही २६ रंगांचे; जे की तोडणी केल्यानंतर पंधरा दिवस बुकेमध्ये ताजे राहते.

 Øलाल, पिवळे सूर्यफूल

 Øजर्मनीतील फुलपिके जसे की साल्विया, व्हर्बेनिया, झिनीया, डायमिटॅलिस, कॉसमॉस, रूटबिकिया, पिटीलोटस याचे ५०पेक्षा जास्त रंग आहेत. कृषी पर्यटन किंवा फोटो शूटिंगकरता शेतकरी याप्रमाणे लागवड करू शकतात.

 ✨ *इस्त्राइलमधील ग्रॅव्हिटी ठिबक*

 Ø इजरायलमधील ग्रॅव्हिटी ठिबक सिंचन. नेहमीचे ठिबक प्रेशरवर चालते, परंतु या तंत्रज्ञानामध्ये फक्त दोन फूट उंचीची पाण्याची टाकी किंवा शेततळे असल्यास ग्रॅव्हिटी जमिनीचा उतार दोन ते तीन फूट असल्यास सलग ५०० ते ६०० फूट लांबीपर्यंत ठिबक लॅटरल एकसारख्या ताशी दोन लिटरच्या प्रवाहाने विना वीज चालतात. शिवाय कुठेही सबमेनची आवश्यकता नाही.ग्रॅव्हिटी Øहे ड्रीप आपण मोटरच्या पाण्यावर चालवायचे असल्यास प्रेशर कमी करून विहिरीच्या किंवा नदीच्या पाण्यावर चालते.ग्रॅव्हिटी Øफिल्टरची आवश्यकता नसते. त्याजागी प्लास्टिक टॅग लावला जातो आणि त्यातून एकसारखी खते व औषधे सोडता येतात. यामध्ये प्रेशर कमी अथवा जास्त होण्याचा काहीच धोका नाही. याला आयओटी (IoT) सेंसरसुद्धा जोडलेआहेत.

 ✨ *रोबोटिक्स व स्वयंचलित यांत्रिकीकरण*

 Øतण नियंत्रण करण्यासाठी तणनाशकाचा वापर करून नियंत्रण मिळवणे खूप अवघड किंवा खर्चिक आणि हानिकारकअसते. यामुळे पिकाचे नुकसान जास्त होते.यावर सध्या AI कॉम्प्युटर विजन आणि मशीन लर्निंगद्वारे कॅमेरा व सेंसरचा वापर करून अचूकरित्या फक्त लेझरच्या सहाय्याने तण मारण्याचे मशीन पुण्यातील कंपनीने करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे.

 Øरोबोटिक म्हणजे सेन्सरचा वापर करून स्वतः पूर्णपणे स्वयंचलित, ड्रायव्हर विना ट्रॅक्टर पेरणी करू शकतो. यासाठी फक्त मशीनला एकदा शेताचा नकाशा काढून दिल्यावर तो ट्रॅक्टर स्वतः ड्रायव्हर विना चालतो.

 Øस्वयंचलित पाणी तसेच खत व्यवस्थापन यंत्रणा, वातावरण नियंत्रणाचे मशीनचे प्रात्यक्षिक

 Øमका हार्वेस्टर, न्यूमॅटिक मशीन पेरणी यंत्र

 ✨ *स्वतंत्र पशुदालन*

 Øदेशभरातील विविध जातींची जनावरे, गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या, श्वान

 Ø विशेष अश्व प्रदर्शन व त्यामध्ये भीमथडी घोड्यांचे आकर्षण

 Ø दूध उत्पादन व कालवड स्पर्धा

 Øडॉग शो

 Øअल्पभूधारक शेतकऱ्यासाठी कमी खर्चातील शेळीपालन, कोंबडीपालन व मत्स्यपालनाचे तंत्रज्ञान

 Øअत्याधुनिक डच डेअरी तंत्रज्ञान

 Øबदकपालन

 Øअॅक्वापोनिक्स पद्धतीने भाजीपाला व मत्स्यपालन

 Øलाल तिलापिया, शोभीवंत मासे

 ✨ *आधुनिक मशिनरी*

 Øस्वयंचलित ट्रॅक्टर

 Øरोबोटद्वारे तण नियंत्रण

 Øड्रोन

 Øमका, कापूस आणि ऊस हार्वेस्टर मशीन्स 

 Øस्वयंचलित पाणी व खत व्यवस्थापन

 ✨भरडधान्य (श्री धान्य)

 Øसकारात्मक, नकारात्मक व तटस्थ भरडधान्य ओळख व प्रात्यक्षिके

 Øकोडो, सावा, सामा, वरई, हिरवा सावा, राळे, नाचणी, ज्वारी, बाजरी त्यांचे आहारातील महत्व

 Øप्रक्रिया पदार्थ निर्मिती जसे कि मिलेट रवा, मैदा, आ��ा, कुकीज, बिस्किटे, शेवई, पास्ता, इडली मिक्स, खिचडी मिक्स इ. व त्यातील उपयुक्त अन्नद्रव्ये मार्गदर्शन

 ✨ इतर आकर्षण

 Øनेदरलँड, चीन, अमेरिका, इस्त्राइल, ब्राझिल, स्पेन, इटली, जर्मनी, अफ्रिका, फ्रान्स, थायलंड, कोरीया, जपान, इंग्लैंड, मेक्सीको, स्विडेन, तुर्कस्थान, ऑस्ट्रेलिया इत्यादि देशांतील विविध AI, सेन्सर व रोबोटिक तंत्रज्ञान बियाणे, खते, औषधे, मशिनरी, पॉलीहाउस, लागवड तंत्रज्ञान स्मार्ट टुल्स पाहण्याची नामी संधी उपलब्ध

 Øया देशांतील तंत्रज्ञानामध्ये जपान येथील बायोफ्लॉक यंत्रणा, नेदरलैंड, स्पेन, जर्मनी, थायलंड इ. देशातील विषमुक्त शेती उत्पादनासाठी आधुनिक औषधे, सेन्सर तंत्रज्ञानावर आधारित नेदरलँड, इंग्लंड, अमेरिका देशातील प्रगत मशिनरी, इस्त्राइल येथील सूक्ष्म सिंचन प्रणाली, इटली येथील सेन्सर चलित मशिनरी तंत्रज्ञान असणार आहे.

 Øनामांकित कंपन्यांची प्रात्यक्षिके व दालने

 आणि बरेच काही...

➖➖➖

𝐊𝐑𝐔𝐒𝐇𝐈𝐊 𝟐𝟎𝟐𝟔 -  भव्य कृषि व पशु प्रदर्शन.नोंदणी कृषिक ॲपद्वारे सुरु (खालील बटन वरून कृषिक ॲप डाउनलोड करावे)

‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪

Post a Comment (0)
Previous Post Next Post