सालटलेल्या बागांचे पुनरुज्जीवन
अयोग्य व्यवस्थापन आणि कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक संत्रा झाडे वरून खाली वाळू लागतात.
उपाययोजना
👉🏽वाळत असलेल्या झाडाच्या हिरव्या फांद्या ३० ते ४५ सें.मी. शेंड्यापासून सिकेटरच्या साह्याने छाटाव्या.
👉🏽वाळलेल्या फांद्यांचा हिरवा भाग २ ते ३ सेंमी ठेवून छाटावा. छाटणी करताना प्रत्येक वेळी सिकेटरचे निर्जंतुकीकरण करावे. यासाठी सिकेटर कार्बेन्डाझीम (१ ग्रॅम प्रति लिटर पाणी) द्रावणात बुडवावे.
👉🏽छाटणीनंतर लगेच कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
👉🏽मोठ्या फांद्या छाटल्या असतील तर त्या ठिकाणी बोर्डो पेस्ट लावावी.
👉🏽झाडाचा संपूर्ण वाफा खोदून मुळ्या उघड्या कराव्या. सडलेल्या मुळ्या काढून टाकाव्या. वाफा ५ ते ७ दिवस उघडा ठेवावा.
👉🏽प्रति झाडास शेणखत ५० किलो, निंबोळी ढेप ७.५ किलो, अमोनियम सल्फेट १ किलो, सिंगल सुपर फॉस्फेट १ किलो, म्युरेट ऑफ पोटॅश अर्धा किलो यांचे मिश्रण करून द्यावे. खत दिल्यानंतर खोदलेले वाफे मातीने चांगले झाकावेत.
👉🏽झाडाच्या बुंध्याला एक मीटर उंचीपर्यंत बोर्डो पेस्ट लावावी.
➖➖➖