या किडीची अळी नुकसान कारक असून मुळांवर आणि नवीन वाढ होत असलेल्या कंदावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. मादी भुंगेरे रोज एक याप्रमाणे अंडी घालतात. त्यातून १५-२० दिवसांत अळी बाहेर पडते. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या सुरवातीला काही दिवस सेंद्रिय पदार्थांवर उपजीविका करतात. सेंद्रिय पदार्थांचा अंश संपल्यानंतर अळ्या हळद पिकाची मुळे कुरतडतात. जास्त प्रादुर्भाव झालेल्या भागात कंदही कुरतडतात. मुळे कुरतडल्यामुळे हळदीचे पीक पिवळे पडते, रोपे वाळू लागतात. हुमणी किडीची जास्त तीव्रता असलेल्या ठिकाणी हळद पिकाचे खोड उपटून पाहिल्यास ते सहज उपटून येते.
🛡एकात्मिक व्यवस्थापन
👉🏽एप्रिल-मे महिन्यात शेत दोन-तीन वेळा उभे आडवे नांगरावे.
👉🏽तव्याचा कुळव किंवा रोटाव्हेटरद्वारे ढेकळे फोडून घ्यावीत.
👉🏽मशागतीच्या कोणत्याही कामावेळी बाहेर पडलेल्या अळ्या गोळा करून माराव्या.
👉🏽वळीवाच्या पहिल्या पावसानंतर हुमणीचे बाहेर पडणारे भुंगेरे बाभूळ किंवा कडूनिबांच्या झाडावर गोळा होतात. फांद्या हलवून खाली पाडावेत किंवा प्रकाश सापळे तयार करून ते गोळा करावेत. गोळा केलेले भुंगेरे रॉकेलमिश्रित पाण्यामध्ये टाकून मारावेत.
👉🏽शेणखत, कंपोस्ट या द्वारे हुमणीच्या अळ्या व अंडी शेतामध्ये जातात. प्रति गाडी शेणखतामध्ये शिफारसीत कीटकनाशक एक किलो याप्रमाणे मिसळून नंतरच त्याचा शेतात वापर करावा.
👉🏽जैविक नियंत्रणासाठी मेटारायझिअम अॅनीसोप्ली किंवा बिव्हेरीया बॅसियाना ही परोपजीवी बुरशी एकरी २ किलो याप्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून पिकाच्या मुळापाशी द्यावी.
👉🏽उभ्या पिकात हुमणीचा प्रादुर्भाव आढळल्यास, क्लोरपायरीफॉस ३ मि.लि. प्रति लिटर पाणी या द्रावणाची आळवणी करावी.
➖➖➖