हळद पिकातील आंतरपीक पद्धती.



हळदीचे पीक २५ टक्के सावलीमध्ये चांगले वाढते. तूर, एरंडीसारख्या पिकांचा वापर हळदीमध्ये सावलीसाठी करावा.आंतरपिके घेताना ती हळद पिकापेक्षा उंचीने कमी, तसेच पसाऱ्याने कमी जागा व्यापणारी असावीत. हळदीची मुळे आणि निवडलेल्या आंतरपिकाची मुळे जमिनीत एका खोलीवर येणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. हळद लागवड केल्यापासून ३ ते ३.५ महिन्यांनी फुटवे येऊन कंद पोसण्यास सुरवात होते. हळकुंडे येण्याच्या

कालावधीपूर्वी आंतरपिकाची काढणी करणे फायदेशीर ठरते. आंतरपिकासाठी घेवडा, झेंडू, मिरची, कोथिंबीर, मेथी, तूर, उडीद, मूग, मुळा, भुईमूग या पिकांची निवड करावी. मका हे पीक हळदीमध्ये घेऊ नये. कारण मक्‍यामुळे हळदीच्या उत्पादनामध्ये १५ ते २० टक्के घट येते.

➖➖➖

राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती. कांदा पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) बटन  वरुन डाउनलोड करा.  📱📱📱


Post a Comment (0)
Previous Post Next Post