गुणवत्तापूर्ण दूध उत्पादनासाठी गाई-म्हशींचे व्यवस्थापन
गाई-म्हशींचा गोठा, पाणी पाजण्याची पद्धत, मोकळेपणा व एकूणच आरामदायी वातावरण असावे. गोठ्याची दिशा व उंची, स्वच्छता, निर्जंतुकीकरण, शेण व मूत्र साठू न देणे, वेळेवर फवारणी, माशा व इतर कीटक यांचा उपद्रव होऊ न देणे, स्वच्छ व ताजे पाणी उपलब्ध करून देणे, वेळेवर जंतनाशक पाजणे, आजारी गाई-म्हशींवर पशुवैद्यकाकडून वेळेवर उपचार करावेत.
दूध काढण्याच्या वेळा पाळाव्यात. माजावर आलेल्या जनावरांना कृत्रिम रेतन करून घेणे किंवा पाडा दाखवावा. सर्व नोंदी ठेवाव्यात. जागेच्या उपलब्धतेनुसार जनावरांची संख्या ठरवावी. लसीकरण, भटके प्राणी, आगंतुकांना गोठ्यामध्ये येण्यास प्रतिबंध करावा. आजारी जनावरांना वेगळे करावे, त्यांचे दूध वेगळे ठेवावे.
➖➖➖
राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती. पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) बटन वरुन डाउनलोड करा. 📱📱📱