कमी तापमानाचे होणारे परिणाम
केळी हे उष्णकटीबंधीय फळपीक असल्याने कमी तापमानास अत्यंत संवेदनशील आहे. विशेषतः तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास केळी पिकाच्या वाढीच्या विविध अवस्थांवर विपरीत परिणाम दिसून येतात.
👉🏽केळीच्या झाडाला नवीन मुळ्या येण्याच्या आणि त्यांच्या वाढीचा वेग मंदावतो. त्यांची क्रियाशीलता देखील कमी होते. त्यामुळे पाणी व अन्नद्रव्ये शोषण्याची क्षमता घटते.
👉🏽कमी झालेल्या तापमानाचा पानांच्या निर्मिती व वाढीवर परिणाम होतो.
👉🏽थंडीमुळे नवीन पानांची गुंडाळी उलगडण्यास वेळ लागतो. अनेकवेळा पानाच्या एका कडेजवळ म्हणजे उलगडणाऱ्या पुंगळीच्या बाहेरील बाजूवर चट्टे दिसून येतात.
👉🏽मुळांद्वारे अन्नद्रव्ये शोषणाची क्षमता कमी झाल्यामुळे पाने एकमेकांजवळ येतात. त्यामुळे पानांचा खूप कमी भाग सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतो. परिणामी, प्रकाश संश्लेषण क्रियेत बाधा येऊन झाडाची वाढ मंदावते.
👉🏽अन्नद्रव्यांचे शोषण व वहन योग्यरीत्या न झाल्याने पाने पिवळसर दिसू लागतात.
👉🏽मुळांची घटलेली कार्यक्षमता आणि नवीन पाने येण्याचा मंदावलेला वेग यामुळे घड निसवण्याच्या अवस्थेतील बागांमध्ये केळफूल बाहेर पडण्यास विलंब होतो.
👉🏽झाडांची एकाचवेळी निसवण होत नाही. तीव्र थंडीच्या काळात घड सामान्यपणे न निघता झाडाचे खोड फोडून बाहेर निघतो. असा घड व्यवस्थित न पोसल्याने कमकुवत राहतो. अशा घडांना बाजारमूल्य नसते.
👉🏽कडाक्याची थंडी दीर्घकाळ राहिल्यास बागेतील काही झाडे वांझ राहतात.
➖➖➖
राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती. हरभरा सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) बटन वरुन डाउनलोड करा. 📱📱📱