तुरीचा पिकाचा खोडवा व्यवस्थापन सल्ला

तुरीचा पिकाचा खोडवा

 
तुरीचा खोडवा

👉🏽 आयसीपीएल ८७, आयसीपीएल ८८०, आयसीपीएल ३९, आयसीपीएल १५१ या कमी कालावधीच्या वाणांचा खोडवा ठेवावा.

👉🏽विपुला, बीएसएमआर ७३६, बीएसएमआर ८५१ किंवा बीडीएन ७०८ व बीडीएन २०१३-४१ (गोदावरी) हे वाण जास्त कालावधीचे असल्याने या वाणांचा खोडवा ठेऊ नये.

👉🏽रब्बी हंगामात दोन-तीन पाण्याच्या पाळया देणे शक्य असेल तरच तुरीचा खोडवा ठेवावा.

👉🏽मर, वांझ रोगग्रस्त पिकाचा खोडवा ठेऊ नये.

👉🏽पक्व शेंगा तोडून गुच्छाच्या खाली १०-१५ सें.मी. अंतर राखून झाडाची फांदी कापून टाकावी.

👉🏽हलकी वखरणी करून एकरी एक पोते डी.ए.पी. खत देऊन पाणी द्यावे.

👉🏽पहिल्या पिकाच्या शेंगा तोडल्यानंतर खोडवा ठेवताना दिलेल्या पाण्यानंतर दुसरे पाणी २० दिवसांनी पुन्हा फुटवे येतेवेळी आणि तिसरे पाणी त्यानंतर २० दिवसांनी शेंगा भरताना द्यावे.

👉🏽खोडवा पिकात तीन-चार आठवड्यांत एक खुरपणी आणि त्यानंतर गरजेनुसार एक-दोन कोळपण्या द्याव्यात.

👉🏽फुलकळी लागताना व फुलोरा जोमात असताना १ टक्का पोटॅशियम नायट्रेट किंवा २ टक्के युरिया किंवा डी.ए.पी.ची फवारणी केल्याने दाण्याचे वजन वाढते, प्रतही चांगली मिळते.

👉🏽शेंगा पोखरणार्‍या अळीच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फुलकळी येताना ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

५० टक्के फुलोरा आल्यानंतर एचएएनपीव्ही ५०० एलई (हेलीओकील) १ मि.लि. प्रति लिटर पाण्यातून फवारावे.

शेंगा भरण्याच्या अवस्थेत इमामेक्टीन बेंझोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

➖➖➖

राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती.  हरभरा सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) बटन  वरुन डाउनलोड करा.  📱📱📱


Post a Comment (0)
Previous Post Next Post