रोग व्यवस्थापन
⭕फुलोऱ्यापूर्वीचा खोडकुजव्या
रोगकारक बुरशी: पिथियम अफॅनीडर्माटम/ इर्विनिया क्रिसान्थेम
अनुकूल हवामान: अधिक उष्ण व आर्द्रतायुक्त
लक्षणे: खोड तपकिरी रंगाचे, आकसलेले, मऊ व जमिनीलगत खोडाला पीळ दिसून येतो.
⚔नियंत्रण: पिथियम अफॅनीडर्माटम– कॅप्टन (७५ डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात जमिनीतून द्यावे.
इर्विनिया क्रिसान्थेम– ब्लिचिंग पावडर (३३% क्लोरीन) ४ किलो प्रति एकरी जमिनीत द्यावी.
⭕ टर्सिकम पर्ण करपा
रोगकारक बुरशी: एक्सेरोहिलम टर्सिकम
अनुकूल हवामान: थंड व अधिक आर्द्रतायुक्त
लक्षणे: पानांवर लांब अंडाकृती, करड्या-हिरव्या रंगाच्या २.५ ते १५ सें.मी. चिरा दिसून येतात.
⚔नियंत्रण: मॅन्कोझेब (७५ डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात ८ ते १० दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
⭕मेडिस पर्ण करपा
रोगकारक बुरशी: ड्रेक्स्लेरा मेडिस
अनुकूल हवामान: उष्ण व दमट
लक्षणे: पानांच्या शिरांमध्ये लांबट तपकिरी किंवा गडद लालसर-तपकिरी रंगाच्या चिरा दिसून येतात.
⚔नियंत्रण: मॅन्कोझेब (७५ डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम किंवा झायनेब (७५ डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
⭕ फुलोऱ्यानंतरचा खोडकुजव्या
रोकारक बुरशी: फ्युजारियम मोनिलीफॉर्म/ मॅक्रोफोमिना फॅजिओलीना
अनुकूल हवामान: फुलोऱ्यात असताना पाण्याचा ताण
लक्षणे: खोडाचा उभा छेद घेतल्यास आतील भाग गुलाबी-जांभळा/ काळ्या रंगाचा दिसतो. प्रादुर्भाव मूळ, खालील पेरे व शेंड्यावर होत असल्याने झाड वाळते.
⚔नियंत्रण: ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक प्रति एकरी २.५ ते ३ किलो या प्रमाणात २५० ते ३०० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून जमिनीतून वापरावे.
➖➖➖
राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती.मका पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) बटन वरुन डाउनलोड करा. 📱📱📱