केळी लागवडीचे हंगाम
महाराष्ट्रत केळी लागवडीचे जून, ऑक्टोबर आणि फेब्रुवारी असे तीन प्रमुख हंगाम आहेत. जून लागवडीस मृगबाग असेही म्हटले जाते. या हंगामात जवळपास ६५ ते ७० टक्के लागवड केली जाते. ऑक्टोबर महिन्यातील लागवडीस कांदेबाग असे म्हणतात. ही लागवड साधारतण: २० ते २५ टक्के असते. थोड्या प्रमाणावर लागवड फेब्रुवारी महिन्यात केली जाते. कुकुंबर मोझॅक रोगाच्या दृष्टीने लागवडीच्या वेळा खासकरून मृगबाग लागवडीची वेळ कटाक्षाने पाळणे गरजेचे आहे. लागवडीच्या वेळा आणि त्यानुसार सर्वसाधारणपणे केळफुल बाहेर पडण्याचा व घड काढणीचा कालावधी खालीलप्रमाणे आहे:
लागवडीचा हंगाम केळफुल बाहेर पडण्याचा कालावधी काढणीचा कालावधी
जून (मृगबाग) जानेवारी ते मार्च एप्रिल ते जून
ऑक्टोबर (कांदेबाग) मे ते जुलै ऑगस्ट ते ऑक्टोबर
फेब्रुवारी सप्टेंबर ते ऑक्टोबर डिसेंबर ते जानेवारी