संत्रा-मोसंबी-लिंबू पिकात झाडे पिवळी पडणे प्रतिबंधात्मक उपाययोजना

 



झाडे पिवळी पडणे

👉🏾 प्रतिबंधात्मक उपाययोजना

पावसाळ्याच्या सुरूवातीस बागेभोवती उताराच्या दिशेने ४-५ फूट खोल, ३-४ फूट रुंदीचे चर खोदावेत. बागेमध्ये सखल भागात दोन ओळींमध्ये १ ते १.५ फूट खोल व तितक्याच रुंदीच्या नाल्या उताराच्या विरुद्ध दिशेने खोदाव्यात.

नवीन बागेमध्ये लागवड गादीवाफ्यावर करावी.

👉🏾उपचारात्मक उपाययोजना

पिवळ्या पडत असलेल्या झाडांच्या आळ्यातील माती ६ इंचापर्यंत उकरून घ्यावी.

वाळलेल्या फांद्यांची छाटणी करून, झाडावर कॉपर ऑक्सिक्लोराईड ३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

झाडांना १८:१८:१० मिश्रखत प्रत्येकी ५०० ग्रॅम याप्रमाणे द्यावे.

झाडाच्या खोडावर डिंक पाझरताना दिसत असल्यास, मेटॅलॅक्झील एम (४%) + मँकोझेब (६४% डब्ल्यूपी) २.७५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे प्रतिझाड ४-५ लिटर द्रावणाची आळ्यामध्ये आळवणी करावी.

बूडकुज किंवा मूळकुज झालेल्या झाडांच्या खोडाभोवती ३-४ इंच दूर जंबेरी/ रंगपूर लिंबाची एक वर्ष वयाची रोपे लावावीत. साधारणपणे ८-१० दिवसांनी या रोपांनी जोम धरल्यावर संत्रा/ मोसंबी झाडाच्या खोडावरील सुदृढ साल असलेल्या जागेवर या रोपांच्या त्या उंचीवरील भागावर तिरकस काप द्यावा. धारदार चाकूने झाडाच्या खोडावर त्या उंचीवर साधारण एक इंच उभी चीर द्यावी. चाकूच्या बोथट बाजूने चीर दिलेली साल सैल करून रोपाचे तिरकस काप दिलेले टोक त्या सालीमध्ये घुसवावे. त्यावर साल घट्ट दाबून त्याभोवती १०० मायक्रॉन जाडीची साधारण १.५ सें.मी. रुंद प्लॅस्टिक पट्टी गुंडाळावी. रोपावरील सर्व पाने, फुटवे काढून टाकावेत. तीन आठवड्यांनी या पट्ट्या काढून घ्याव्यात. एका झाडावर २-४ रोपांचे कलम बांधावे. त्यातील किमान १-२ कलमे यशस्वी झाल्यास झाडाचे पुनरुज्जीवन होते.

➖➖➖

राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती. संत्रा-मोसंबी-लिंबू पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) बटन  वरुन डाउनलोड करा.  📱📱📱

Post a Comment (0)
Previous Post Next Post