डाळिंब मृग बहार बागेची अवस्था-विश्रांती दरम्यानचे खत नियोजन

मृग बहार (बागेची अवस्था- विश्रांती)

अन्नद्रव्य व्यवस्थापन

डाळिंब विश्रांती दरम्यानचे खत नियोजन

👉🏽 आधीच्या बहाराची फळे तोडणी झाल्यानंतर, शेणखत २०-२५ किलो किंवा १३-१५ किलो शेणखत +  २ किलो गांडूळखत + २ किलो निंबोळी पेंड किंवा ७.५ किलो कोंबडी खत + २ किलो निंबोळी पेंड प्रतिझाड द्यावे.

👉🏽 रासायनिक खतामध्ये २०५ ग्रॅम नत्र (४४६ ग्रॅम युरिया), ५० ग्रॅम स्फुरद (३१५ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट), १५२ ग्रॅम पालाश (२५४ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश) प्रतिझाड देऊन हलके पाणी द्यावे.

👉🏽 रासायनिक खते दिल्याच्या तीन ते चार आठवड्यांनी, जैविक फॉर्म्युलेशन्स मिश्रण द्यावे. अॅझोस्पिरिलम स्पे किंवा ॲस्परजिलस नायजर किंवा ट्रायकोडर्मा व्हिरिडी १ किलो आणि पेनिसिलिअम पिनोफायलम एकरी ३ किलो हे २ ते ५ क्विंटल चांगल्या कुजलेल्या शेणखतात १:२५ या प्रमाणात मिसळून या मिश्रणाचे सावलीत वेगवेगळ्या ठिकाणी बेड तयार करून, हलके पाणी शिंपडत त्यात १५ दिवस ६० ते ७० टक्के ओलावा ठेवावा. दर दोन दिवसांआड उलथापालथ करत राहावे. शेतात या मिश्रणाचा वापर करण्यापूर्वी त्यात अर्बास्कूलर मायकोरायझा बुरशी हे जैविक फॉर्म्युलेशन एकरी १ किलो प्रमाणे मिसळावे. हे मिश्रण बागेमध्ये ३०० झाडांना किंवा एक एकर क्षेत्रावर द्यावे.

➖➖➖

राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती. कांदा  पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) लिंक वरुन डाउनलोड करा. 📱📱📱





Post a Comment (0)
Previous Post Next Post