गहू पिक आठवडी सल्ला सुधारित वाणांची निवड

सुधारित वाण

गहू पिक आठवडी सल्ला सुधारित वाणांची निवड

👉🏽 फुले समाधान:
 बागायती वेळेवर आणि बागायती उशिरा पेरणीसाठी उत्तम सरबती वाण, तांबेरा व मावा प्रतिकारक्षम, प्रथिने १२%पेक्षा अधिक, चपातीसाठी उत्तम, ११५ दिवसांत कापणीस तयार, उत्पादनक्षमता वेळेवर पेरणी ४५-५०, उशिरा पेरणी ४२-४५ क्विं/हे.

👉🏽 फुले सात्विक:
संरक्षित पाण्याखाली नियमित उत्पादनासाठी सरबती वाण, प्रथिने ११-१२%, दाण्याचा कडकपणा ३०-४५%, बिस्कीट स्प्रेड मानक दहापेक्षा अधिक, ब्रेड गुणवत्ता स्कोर ७-७.५, ग्लूटेन इंडेक्स ८०-८५%, तांबेरा रोगप्रतिकारक्षम, उत्पादनक्षमता ३५-४० क्विं/हे.

👉🏽 एनआयडीडब्ल्यू-११४९:
जिरायती किंवा एका ओलिताखाली वेळेवर पेरणीसाठी बन्सी वाण, प्रथिने ११.५%, तांबेरा रोगप्रतिकारक, शेवया, कुरडई, पास्तासाठी उत्तम, ११०-११५ दिवसांत कापणीस तयार, उत्पादनक्षमता ३५-४० क्विं/हे.

👉🏽 नेत्रावती:
जिरायती आणि मर्यादित सिंचनाखाली पेरणीसाठी उत्तम सरबती वाण, दाणे मध्यम व आकर्षक, प्रथिने १२%पेक्षा अधिक, तांबेरा रोगप्रतिकारक, चपातीसाठी उत्तम, ११०-११५ दिवसांत कापणीस तयार, उत्पादनक्षमता जिरायती १८-२०, मर्यादित सिंचनाखाली २७-३० क्विं/हे.

👉🏽 तपोवन:
बागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम सरबती वाण, दाणे मध्यम, ओंब्यांची संख्या जास्त, प्रथिने १२.५%, तांबेरा रोगप्रतिकारक, चपातीसाठी उत्तम, ११५ दिवसांत कापणीस तयार, उत्पादनक्षमता ४५-५० क्विं/हे.

👉🏽 गोदावरी:
बागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम बक्षी वाण, दाणे टपोरे, चमकदार आणि आकर्षक, प्रथिने १२%पेक्षा अधिक, तांबेरा रोगप्रतिकारक, रवा, शेवया, कुरडईसाठी उत्तम, ११०-११५ दिवसांत कापणीस तयार, उत्पादनक्षमता ४५-५० क्विं/हे.

👉🏽पंचवटी:
जिरायती पेरणीसाठी उत्तम बन्सी वाण, दाणे टपोरे, चमकदार आणि आकर्षक, प्रथिने १२%, तांबेरा रोगप्रतिकारक, रवा, शेवया, कुरडईसाठी उत्तम, १०५ दिवसांत कापणीस तयार, उत्पादनक्षमता १
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post