केळी पिक सल्ला
कांदेबाग केळी लागवड
👉🏽 केळीच्या श्रीमंती, फुले प्राइड यांसारख्या बुटक्या वाणांची लागवड १.५ x १.५ मीटर अंतरावर करावी. तर ग्रॅडनैन या उंच वाढणाऱ्या वाणाची १.७५ x १.७५ मीटर अंतरावर लागवड करावी. योग्य अंतरावर लागवड केल्यामुळे बागेत हवा खेळती राहून झाडे निरोगी राहण्यास मदत होते. दाट लागवडीमुळे सिगाटोका व सीएमव्ही रोगाच्या प्रादुर्भावास अनुकूल वातावरण निर्मिती होते.
👉🏽 केळीची लागवड गादीवाफ्यावर करावी. गादीवाफ्यावर लागवड केल्यामुळे मुळांची वाढ चांगली होऊन झाडांची वाढ चांगली होते. त्यामुळे साहजिकच घडांची वाढ चांगली होऊन ते वजनानेदेखील अधिक भरतात.
👉🏽 वेळोवेळी बागेत हलकी टिचणी करून झाडांना भर देत रहावे. त्यामुळे वादळी वाऱ्यामुळे झाडे पडण्याचे प्रमाण कमी होते.
👉🏽 केळीची लागवड कंद किंवा उतिसंवर्धित रोपांपासून केली जाते. रोगांच्या प्राथमिक प्रसारास लागवड साहित्य मुख्यतः कारणीभूत ठरते.
👉🏽 कंदापासून लागवड करताना कंद निरोगी बागेतून निवडावेत. लागवडीपूर्वी शिफारशीप्रमाणे कंदप्रक्रिया करावी.
👉🏽 शेतकऱ्यांचा कल ऊतीसंवर्धित रोपांकडे अधिक आहे. मुळातच उतिसंवर्धित रोपे नाजूक असल्याने ती रोगास सहज बळी पडतात. उतिसंवर्धित रोपांची लागवड करताना रोपे उत्तम दुय्यम कणखरता असलेली व ४ ते ५ पान असलेली निवडावीत. छोटी, कमी पाने असलेली पुरेशी कणखरता नसलेली रोपे लागवडीसाठी निवडू नयेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.