काळा करपा (पीळ)
सतत तीन दिवस पाऊस, ८५ टक्क्यांपेक्षा अधिक सापेक्ष आर्द्रता आणि ढगाळ वातावरण असल्यास काळा करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. यामध्ये सुरुवातीला पानाची बाह्य बाजू व बुडख्याजवळ राखाडी रंगाचे ठिपके आढळतात. त्यावर बारीक गोलाकार आणि उठावदार ठिपके वाढून पाने वाळतात. कांद्यांची वाढ होत नाही. रोपवाटिकेतही रोपांची पाने काळी पडून वाळतात, रोपे मरतात.
🛡व्यवस्थापन
👉🏽 रोपवाटिका गादीवाफ्यावर करावी.
👉🏽 पुनर्लागवडीवेळी रोपे कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणात बुडवून लागवड करावी.
👉🏽 कांद्याची लागवड पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीतच करावी.
👉🏽 शेतात ट्रायकोडर्मा व्हिरीडी ५०० ग्रॅम प्रति एकर, २०० किलो शेणखतात मिसळून वापरावे.
👉🏽 नियंत्रणासाठी, फवारणी (प्रति लिटर पाणी)
मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.