केळी पिक रोग नियंत्रण


 केळी पिक
🍌🍌

रोग नियंत्रण

👉 करपा (सिगाटोका) 

केळी करपा (सिगाटोका) (इर्विनिया रॉट) सूत्रकृमी
रोगग्रस्त पाने काढून जाळावीत.

मॅंकोझेब/ कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ग्रॅम अधिक स्टीकर १ मि.लि. किंवा प्रोपीकोनॅझोल ०.५ मि.लि. अधिक मिनरल ऑईल १० मि.लि. प्रति लिटर पाणी प्रमाणे २० दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.

👉 पोंगा कुज (इर्विनिया रॉट)

या रोगाची लक्षणे दिसताच १०० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड व ३०० मि.लि. क्लोरपायरीफॉस मिसळून या द्रावणाची २०० मि.लि. प्रतिझाड आळवणी (ड्रेचिंग) करावी किंवा लागवडीच्या वेळी प्रति झाड ६ ग्रॅम ब्लिचिंग भुकटी जमिनीतून द्यावी. त्यानंतर १ महिन्याच्या अंतराने पुन्हा द्यावे.

⭕ कीड नियंत्रण

👉 सोंडकिडे

पिकांची फेरपालट करावी.

कंदप्रक्रिया करावी.

सापळा म्हणून खोडाचे १५ ते ३० सें.मी. लांबीचे उभे काप एकरी १० ते १५ या प्रमाणात बागेत ठेवावे.

👉 मावा

बाग तणमुक्त ठेवावी.

डायमेथोएट (३० इसी) २ मि.लि. अधिक निंबोळी तेल ५ मि.लि. अधिक स्टीकर १ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून दर चार ते सहा दिवसांनी फवारावे.

👉 सूत्रकृमी

लागवडीच्या वेळी प्रति झाड अर्धा ते एक किलो निंबोळी पावडर वापरावी.

केळी बागेत झेंडू हे आंतरपीक घ्यावे.

-------------------------------

अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post