संत्रा-मोसंबी-लिंबू पिक सल्ला 🍋🍊
जून महिन्यात भरून ठेवलेल्या खड्ड्यात कलमांची लागवड करावी. कलम लावताना कलमाचा डोळा १५ ते २० सें.मी. उंचीवर असावा. कलम लावण्यापूर्वी मुळे मेटॅलॅक्झील एम (४%) + मॅन्कोझेब (६४% डब्ल्यूपी) हे संयुक्त बुरशीनाशक २.५ ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणात १० ते १५ मिनिटे बुडवून ठेवावीत.
नवीन बागेत आंतरपिके घ्यावयाची असल्यास भुईमूग, उडीद, मूग, सोयाबीन पिके घ्यावीत. हिरवळीच्या खताकरिता धैंचा बी १६ किलो प्रति एकर याप्रमाणे पेरावे.
-------------------------------
अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.