सोयाबीन खोडमाशी
या किडीचा प्रादुर्भाव सोयाबीनची उगवण झाल्यापासून कधीही होऊ शकतो. खोडमाशीच्या प्रादुर्भावामुळे रोपावस्थेत झाडाचे शेंडे झुकतात, पाने पिवळी पडून सुकतात व शेवटी मरतात. खोडमाशीच्या उशिरा झालेल्या प्रादुर्भावामुळे झाडे सहसा मरत नाहीत, परंतु शेंगा धरण्याचे प्रमाण कमी होते व दाण्याचा आकार लहान होऊन उत्पादनात घट येते. खोडमाशीमुळे सोयाबीन पिकाचे ३० ते ६० टक्क्यांपर्यंत नुकसान होत असल्याचे आढळले आहे.
🛡 व्यवस्थापन
✅सोयाबीन पेरणीपूर्वी शेताची उन्हाळ्यात खोल नांगरणी करावी.
✅प्रत्येक क्षेत्रामध्ये पाऊसमानानुसार ७५-१०० मि.मी. पाऊस झाल्यानंतर जास्तीत जास्त आठ दिवसांच्या आत पेरणी आटपावी.
✅पेरणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत संपवावी.
✅शिफारशीप्रमाणेच नत्र खताची मात्रा द्यावी. अतिरिक्त मात्रा दिल्याने किडीचा प्रादुर्भाव वाढतो.
✅पेरणीसाठी कीड प्रतिकारक्षम वाणाचा वापर करावा.
✅पेरणीपूर्वी बुरशीनाशकासोबत थायमिथोक्झाम (३० एफएस) १० मि.लि. प्रति किलो बियाणे प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
✅पेरणीनंतर १५ दिवसांनी १५ x ३० सें.मी. किंवा तत्सम आकाराचे फोमशीटचे पिवळे चिकट सापळे एकरी ६४ याप्रमाणे साधारणपणे ८-१० मीटर अंतरावर लावावेत.
✅रासायनिक नियंत्रण किडीच्या प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी पहिली फवारणी, थायमिथोक्झाम (१२.६%) + लॅमडा सायहॅलोथ्रीन (९.५% झेडसी) ०.२५ मि.लि. किंवा इथिऑन (५० ईसी) ३ मि.लि. प्रति लिटर पाणी प्रमाणे करावी.
३० ते ३५ दिवसांनी दुसरी फवारणी, क्लोरॲण्ट्रानीलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मि.लि. किंवा इंडोक्साकार्ब (१५.८ ईसी) ०.६७ मि.लि. प्रति लिटर पाणी प्रमाणे करावी.
-------------------------------
अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.