केळी पिकातील कुकुंबर मोझॅक विषाणू रोग व्यवस्थापन


कुकुंबर मोझॅक विषाणू (सी.एम.व्ही.) 

सुरूवातीला कोवळ्या पानांच्या शिरांमधील हरीतद्रव्य लोप पावते. त्यामुळे पानांवर पिवळसर पट्टे दिसतात. हे पट्टे तुटक तुटक किंवा संपूर्ण पानांवर आढळून येतात. कालांतराने पानांच्या शिरांमधील भाग काळपट पडून तेथील ऊती मरतात, पाने फाटतात. पानांचा पृष्ठभाग आकसतो. पानाच्या कडा वाकड्या होऊन पाने एकमेकांजवळ येतात. पानांच्या शिरा ताठर होऊन संपूर्ण पान कडक होते रोगाच्या जास्त तीव्र अवस्थेत पोंग्याजवळील पाने पिवळे पडून पोंगा सडतो. झाडाची वाढ खुंटते.

रोग व्यवस्थापन

👉प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सामूहिकरीत्या गावपातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे.

👉कंदापासून लागवड करताना रोगमुक्त बागेतून कंद घ्यावेत.

👉ऊती संर्वर्धित रोपांची लागवड करताना, ६ ते ७ पाने असलेली, किमान अडीच महिने वयाची रोपे निवडावीत.

👉केळी लागवड मेअखेर किंवा जूनच्या सुरवातीला करावी. उशिरा म्हणजेच जुलै-ऑगस्टमध्ये लागवड करणे टाळावे.

👉केळीबाग व बांध कायम तणमुक्त व स्वच्छ ठेवावेत.

👉केळीबाग किंवा बागेच्या परिसरात काकडीवर्गीय पिके, टोमॅटो, मिरची, वांगी, उडीद, मूग, सोयाबीन, कपाशी अशा पिकांची लागवड करणे टाळावे.

👉बागेभोवती उगवलेले रान कारली, शेंदणी, करटुली, गुळवेल यांसारख्या रानटी झाडांचे वेल मुळांसहित उपटून नष्ट करावेत.

👉रोगप्रसार मावा किडीमार्फत होतो. म्हणून मावा कीड नियंत्रणासाठी शिफारशीप्रमाणे फवारणी करावी.

मावा कीड नियंत्रणासाठी रासायनिक फवारणी (प्रति लिटर पाणी)

सुरवातीच्या टप्प्यात, डायमेथोएट (३० ईसी) २ मि.लि.

त्यानंतर प्रादुर्भाव पाहून, इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.३ मि.लि.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

केळी पिकाचे संतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापन बघण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा 👇🏼👇🏼


Post a Comment (0)
Previous Post Next Post