हळद पिक लागवडीसाठी बियाणे निवड

 बियाणे निवड

हळद लागवडीच्या दृष्टीने बियाण्याची निवड महत्त्वाची आहे, कारण एकदा घेतलेले बियाणे सर्वसाधारणपणे ५ वर्षांपर्यंत वापरता येते. बियाणे हे जातिवंत, रोग-किडमुक्त असावे. प्रामुख्याने फुले स्वरूपा, सेलम, रोमा, प्रतिभा, प्रगति यांसारख्या जातींची निवड करावी. बियाण्याची सुप्तावस्था संपलेली म्हणजेच १.५-२ महिने काढणीनंतर सावलीत साठवणूक केलेले असावे. मातृकंद बियाणे असल्यास ते त्रिकोणाकृती असावे. बियाण्यावर १ ते २ डोळे चांगले फुगलेले असावे. बियाण्यामध्ये इतर जातींची भेसळ नसावी. हळद लागवडीसाठी प्रामुख्याने तीन प्रकारचे बियाणे वापरतात. मातृकंद/जेठा गड्डे प्रकारचे बियाणे हे मुख्य
कृषिक हळद,आले ग्रुप ला खालील दिलेल्या लिंक वरून जॉईन व्हा
रोपाच्या खाली जे कंद तयार होतात त्यास म्हणतात. याचे वजन ५० ग्रॅमपेक्षा जास्त असावे. याप्रकारचे एकरी ११-१२ क्विंटल बियाणे लागते. बगल गड्डे/अंगठा गड्डे प्रकारचे बियाणे म्हणजे मुख्य रोपाच्या बाजूला जे फुटवे येतात, त्याच्या खाली तयार होणारे कंद होय. या कंदाचे वजन ४० ग्रॅमपेक्षा जास्त असावे. याप्रकारचे एकरी १० क्विंटल बियाणे लागते. ओली हळकुंडेही बियाणे म्हणून वापरू शकतो; परंतु त्यांचे वजन ३० ग्रॅमपेक्षा जास्त असावे. याप्रकारचे एकरी ९-१० क्विंटल बियाणे लागते. सुरवातीला बियाणे तयार करण्याच्या दृष्टीने याप्रकारचे बियाणे उत्तम आहे, परंतु मातृकंदापासून मिळणारे उत्पादन हळकुंडापासून मिळणाऱ्या उत्पादनापेक्षा १५-२०% जास्त असते. लागवडीपूर्वी १५ दिवस बियाणे साठवलेल्या ढिगावरती पाणी मारावे, जेणेकरून ढीगामधील आर्द्रता वाढून बियाण्याची सुप्तावस्था संपून अंकुरण सुरू होते. पाणी मारल्यानंतर एक आठवड्याने बियाण्याच्या मुळ्या साफ करून ते लागवडीस तयार करावे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------
अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post