हळद पिकातील सुधारित जाती

 हळद     

सुधारित जाती

✨ आयआयएसआर प्रगती: कालावधी १८० दिवस, सरासरी झाडाची उंची १०४ सें.मी., सरासरी पानाची लांबी व रुंदी ४९×१३.३ सें.मी., सरासरी फुटव्यांची संख्या ३.५/झाड, सरासरी पानांची संख्या १५.८७/फुटवा, सरासरी गड्ड्यांची संख्या ३, सरासरी उत्पादन ५७७.९३ ग्रॅम/झाड, गाभ्याचा रंग नारंगी, कुरकुमीन ५.०२%, उतारा १६-२०%, ओल्या हळदीचे उत्पादन ३८०-५२० क्विंटल/हेक्टर, ओलिओरेझीन १५.२९%, सुगंधी तेल ६.३%, सूत्रकृमींना प्रतिकारक्षम

✨ फुले स्वरूपा: कालावधी २५५ दिवस, ५०-५५ ग्रॅमपर्यंत वजनाचे मध्यम गड्डे, सरळ व लांब वाढणारी ३५-४० ग्रॅम वजनाची प्रत्येक कंदात ७-८ हळकुंडे, बियाणे उत्पादन प्रमाण १.५, गाभ्याचा रंग पिवळसर, कुरकुमीनचे प्रमाण ५.१९%, उतारा २२%, ओल्या हळदीचे उत्पादन ३५८.३० क्विंटल/हेक्टर, वाळलेल्या हळदीचे उत्पादन ७८.८२ क्विंटल/हेक्टर, पानावरील करपा व कंदमाशीस प्रतिकारक

✨ फुले हरिद्रा: ओल्या व वाळलेल्या हळदीचे अधिक उत्पादन, गाभ्याचा रंग गर्द पिवळसर, सरळ हळकुंडे, अधिक कुरकुमीन

✨ सेलम: कालावधी २७० दिवस, जाड आणि ठसठशीत हळकुंडे व उपहळकुंडे, हळकुंडाची साल पातळ, गाभ्याचा रंग गर्द पिवळा, ओल्या हळदीचे उत्पादन ३५०-४०० क्विंटल/हेक्टर, वाळलेल्या हळदीचे उत्पादन ७०-८० क्विंटल/हेक्टर, करपा रोगास बळी पडते.

राजापुरी: हळकुंडे व उपहळकुंडे आखूड, जाड व अंगठ्यासारखी ठसठशीत, हळकुंडाची साल पातळ, गाभ्याचा रंग पिवळा ते गर्द पिवळा, उतारा १८-२०%, ओल्या हळदीचे उत्पादन २४०-२५० क्विंटल/हेक्टर, वाळलेल्या हळदीचे उत्पादन ४५-५० क्विंटल/हेक्टर, करपा रोगास बळी पडते.

✨ वायगाव: हळकुंडे लांब व प्रमाणबद्ध, गाभा गर्द पिवळा, उतारा २०-२१%, ओल्या हळदीचे उत्पादन २६५-२७० क्विंटल/हेक्टर, वाळलेल्या हळदीचे उत्पादन ५२-५५ क्विंटल/हेक्टर

---------------------------------------------------------------------------------------------------------------
अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post