संत्रा-मोसंबी-लिंबू
सिंचन व्यवस्थापन
आंबिया बहाराची फळे झाडावर टिकण्यासाठी संत्रा, मोसंबी बागेमध्ये नियमित पाणी देणे सुरू ठेवावे. उन्हाचे प्रमाण वाढत असून, तापमानामध्ये वाढ झाल्याने पाण्याच्या पाळ्यांमधील दिवसाचे अंतर ६ ते ७ दिवसांचे करावे.
संत्रा व मोसंबी १ वर्षाच्या झाडाला १४ लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड द्यावे. २ वर्षांच्या झाडाला दुप्पट (२८ लिटर), ३ वर्षांच्या झाडाला तिप्पट (५६ लिटर), ८ वर्षांच्या झाडाला १६३ लिटर आणि १० वर्षे व त्यावरील वयाच्या झाडाला २०४ लिटर/ दिवस/ झाड द्यावे.
लिंबू १ वर्षाच्या झाडाला ११ लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड द्यावे. २ वर्षांच्या झाडाला १६ लिटर; तर ८ वर्षाच्या झाडाला ६५ लिटर आणि १० किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या झाडाला १०० लिटर/ दिवस/ झाड पाण्याची गरज असते.
झाडाभोवती ओलावा टिकून राहण्यासाठी शेतातील गवत, तणस, गव्हांडा, कुटार यांचा ५ ते १० सें.मी. थर देऊन झाडाभोवती आच्छादन करावे. यामुळे बाष्पीभवन कमी होते.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------